Connect with us

गोवा खबर

१० ते १२ एप्रिलपर्यंत गोवा व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन

Published

on

Spread the love

गोवा खबर : कारखाने आणि बॉयलर्स निरीक्षक कार्यालयाने १० ते १२ एप्रिलपर्यंत बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे  गोवा व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन २०२५ चे आयोजन केले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे ज्ञान आणि उपाय योजनावर च्रर्चा करणे, आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान, उपकरणे आणि उपायांचे प्रदर्शन आणि नवीन सुरक्षा धोरण आणि सुधारणांसाठी समर्थन करणे,  व्यावसायिकांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि जागरूकता वाढविणे, सुरक्षा उपायांविषयी आव्हाने ओळखणे हे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.  प्रतिनिधी आणि अतिथी म्हणून नोंदणीसाठी, https://www.goaoshexposummit.com ला भेट द्यावी.