गोवा खबर : समाज कल्याण संचालनालयाने माईंडक्युब मल्टिसर्व्हिसीस प्रा. ली यांच्या सहकार्याने २५ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता राज भवन येथे इम्पेक्ट बियॉण्ड मेजर सीएसआर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यावेळी प्रमुख पाहुणे असतील. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई सन्माननीय पाहुणे असतील. माईंडक्युब मल्टिसर्व्हिसीसच्या संस्थापक आणि संचालक अर्पिता राय यांनी हा सोहळा पुरस्कृत केला आहे.