गोवा खबर : वाळपई पोलिसांनी 500 किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी चौघांना अटक केली. चोर्ला घाटातून येणार्या वाहनावर केरी तपासणी नाक्यावर रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती डिचोलीचे पोलिस उपाधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.
या प्रकरणी अमानली हुसेनसाब देसाई (23, रा. झुआरीनगर), सय्यद अमीनसाब मोकाशी (29, मांगोर हिल), सोहेल सलीम नायकवाडी (28, बेळगाव) आणि इरफान आसिफ बागवान (23, रा. बेळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर, उपनिरीक्षक प्रथमेश गावस, शिपाई सोमनाथ उस्तेकर, निखिल गावस, संगीता ढोरे यांनी ही कारवाई केली.

दुपारी 2:30 वाजता कार क्रमांक जीए-03-वाय-7867 आणि कार क्रमांक जीए-05-बी-9993 या ताब्यात घेण्यात आल्या. दोन्ही गाड्यांची तपासणी करताना एकूण पावणेतीन लाख रुपये किमतीचे 500 किलो गोमांस आढळले. वाहनांसह 18 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.