गोवा खबर : अखिल भारतीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ १४ ते १८ फेब्रुवारी आणि १९ ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्समध्ये विविध ठिकाणी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन करीत आहे.
गोवा राज्य नागरी सेवा संघ निवडण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने निवड चाचणीचे आयोजन केले आहे. व्हॉलीबॉल निवड चाचणी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पणजी जवळील मसान-डे-अमोरिम ग्राउंड येथे होईल आणि ऍथलेटिक्स निवड चाचणी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता ऍथलेटिक स्टेडियम बांबोळी येथे होईल.
इच्छुक सरकारी कर्मचारी खेळाडूनी प्रभारी अधिकारी आंतोनेता पिंटो यांच्याकडे संपर्क साधावा आणि विभाग प्रमुखांनी रीतसर स्वाक्षरी केलेले ओळखपत्र आणि योग्य प्लेइंग किटसह दुपारी ३ वाजता कार्यक्रमस्थळी हजर रहावे.
ज्या कर्मचाऱ्यांनी ६ महिन्यांपेक्षा कमी सेवा दिल्या आहेत ते या निवडणूक चाचण्यांमध्ये भाग घेण्यास पात्र नाहीत.