‘Stranded in India’ या नविन पोर्टलव्दारे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या परदेशी पर्यटकांना मदत

0
230

गोवा खबर:पर्यटन मंत्रालय पर्यटक, हॉटेल्स आणि इतर भागधारकांनी घ्यायची खबरदारी आणि पर्यटक तसेच पर्यटन उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठीच्या सुरक्षा उपाययोजना यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे आणि सूचना हॉटेल उद्योजक आणि संबंधितांपर्यंत मोठ्या प्रमाणवर पोहोचवत आहे.

ही मार्गदर्शक तत्वे आणि सल्ले विविध भारतीय पर्यटक कार्यालयांना देखील पाठवण्यात आली आहेत जेणेकरून ते त्यांच्या क्षेत्रात समन्वय आणि सक्रीय निगराणी ठेऊ शकतील. कोविड-19 चे हॉटस्पॉट असणाऱ्या देशातून आलेल्या प्रवाशांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रभावित व्यक्तींना वेगळे आणि अलग ठेवण्यासाठीच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हॉटेलमालकांसाठी असणाऱ्या सुरक्षा उपाययोजनानुसार त्या हॉटेल मालकांनी व्यक्तींच्या हालचालींचे निरीक्षण करायचे आहे तसेच सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. या सगळ्यामध्ये पर्यटन मंत्रालय, राज्य पर्यटन विभाग आणि राज्य प्रशासनाला सक्रीय सहकार्य करत आहे.

या दरम्यान ‘Stranded in India’ हे पोर्टल पर्यटकांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी यशस्वीरीत्या कार्य करत आहे. हे व्यासपीठ बहु-संस्था सक्षम समन्वय कशाप्रकारे साधत आहे, याची काही उदाहरणे पुढीप्रमाणे आहेत. गुजरात सरकारने तिथे अडकलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी वाहन पास जारी केले आहेत. गुजरात पर्यटन विभाग आणि पर्यटन मंत्रालय, पश्चिम विभाग या नागरिकांच्या देशांतर्गत प्रवास आणि अमेरिकेत परत जाण्यासाठीच्या विमान प्रवासासाठी अमेरिकन दूतावासाशी समन्वय साधत आहेत.

बिहारमध्ये अडकलेल्या एका अमेरिकन नागरिकाला तिच्या पुढील विमान प्रवासासाठी दिल्लीला जाण्याचा प्रवास परवाना देण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन नागरिकांचे तीन गट सिलीगुडी आणि कोलकत्ता येथे अडकले होते आणि त्यांनी Stranded in India या पोर्टलवर त्यांना तेथून बाहेर काढण्याची विनंती केली होती. भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या कोलकत्ता कार्यालयाने यावर तत्काळ कारवाई केली आणि दिल्लीतील त्यांच्या उच्चायुक्तांशी संपर्क करत त्यांना त्यांच्या मायदेशी सुरक्षित पाठवण्यासाठी काम सुरु केले आहे.