St+art इंडिया फाऊंडेशन आणि सेरेंडिपिटी कला महोत्‍सव २०१७ च्या सहयोगातून लोककलेच्या माध्यमातून गोव्याच्या रस्त्यांवर संस्कृतीचे प्रदर्शन

0
1088


पणजी : मुंबई व हैद्राबादमधील लोकांकडून भरघोस प्रतिसाद
मिळाल्‍यानंतर भारतातील लोककला चळवळीला वाहून घेतलेल्या St+art इंडिया फाऊंडेशनने
सेरेंडिपिटी कला महोत्‍सव (एसएएफ) २०१७ दरम्‍यान लोककलेला पणजी शहराचा एक भाग
म्‍हणून सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सेरेंडिपिटी कला महोत्‍सव हा
अत्‍यंत शिस्‍तबद्ध व सांस्‍कृतिक कार्यक्रम आहे. यामध्‍ये व्हिज्‍युअल, परफॉर्मन्‍सेस व
पाककलेला एकत्र सादर केले जाईल. कलाकारांचे पॅनेल व संस्‍थांद्वारे तयार करण्‍यात
आलेल्‍या सेरेंडिपिटी कला महोत्‍सवाच्‍या दुस-या पर्वामध्‍ये ७० कलाप्रकारांसोबतच ४०
प्रकल्‍पे सादर करण्‍यात येतील, जी खास महोत्‍सवासाठी तयार करण्‍यात आली आहेत.
St+art इंडिया फाऊंडेशन आणि एशियन पेंट्स या सहयोगातून विविध सर्जनशील व्यक्तींना
पणजी शहराकडे त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या सर्वांच्या
सर्जनशील नजरेतून समोर आलेले रूप शहरी पटलावर मांडणे हा या सहयोगाचा हेतू आहे.
यासोबतच गोवन संस्कृतीचेही दर्शन घडवले जाणार आहे. गोव्‍यामधील लोक कसे आहेत
आणि कोणत्‍या गोष्‍टीने त्‍याला/तिला गोवेकर बनण्‍यास प्रवृत्‍त केले याचाही धांडोळा
घेतला जाईल. स्थानिक गोवेकर आणि गोवेकरांच्या भाषेत भिंगतास म्हणजेच बाहेरच्या
लोकांसाठी गोव्याच्या रस्त्यांवर गोवन संस्कृतीचे प्रदर्शन मांडून त्यातून गोव्याची एक नवी
बाजू, एक नवा चेहरा शोधण्याचा प्रयत्न या कला महोत्सवातून केला जाणार आहे.
St+art गोवाचे क्‍यूरेटर हनिफ कुरेशी म्‍हणाले,पणजी शहर भारतातील इतर शहरांपेक्षा
अत्‍यंत वेगळे आहे. St+art गोवामधील विविध प्रकल्पांमधून फक्त भिंती रंगवण्यावर नाही तर
या शहराचे व्यक्तिमत्त्व चितारण्यावर भर देण्यात येणार आहे. आम्‍ही सार्वजनिक ठिकाणी
सादर करणा-या कन्‍टेन्‍टबाबत खूपच दक्षता बाळगली आहे. आम्‍ही सेरेंडिपिटी कला
महोत्‍सवासह दरवर्षी कलेला नवीन रूप देण्‍याची आशा बाळगतो.
एशियन पेंट्स लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित सिंगल म्‍हणाले, दरवर्षीप्रमाणे
आम्‍ही पुन्‍हा एकदा शहराच्‍या उत्साहात भर घालण्याची आणि लोकांचा मूड, उत्‍साह व
जीवन नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची आशा करतो. लोकांना कलेची ओळख करून द्यावी
आणि व्‍यापक प्रेक्षकांना ही कला उपलब्‍ध करून द्यावी, असे आम्हाला वाटते. शहराच्‍या
रस्‍त्‍यांवर संवाद, संभाषण व संस्‍कृतीच्‍या माध्‍यमातून कला सादर केली जाईल.
म्‍युरालिस्‍ट्स, ग्राफिक डिझाइनर्स, पेन्‍टर्स, व्हिज्‍युअल आर्टिस्‍ट्स व कटआऊट
पेन्‍टर्सच्या साह्याने शहरातील प्रसिद्ध समुद्रकिना-यांबरोबरच गोव्‍याची नव्याने ओळख
करून देण्‍याचा St+art इंडिया फाऊंडेशनचा हेतू आहे. ही संस्था लोकांना पणजी शहरामधील
इन्‍स्‍टॉलेशन व म्‍युराल्‍समध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आमंत्रित करत आहे.

यंदा डिसेंबरमध्‍ये सेरेंडिपिटी कला महोत्‍सव २०१७ चा भाग म्‍हणून St+art गोवा २०१७
साठी विविध प्रकल्‍प पुढीलप्रमाणे:
कटआऊट प्रकल्‍प
तामिळनाडू व आसपासच्‍या राज्‍यांमधील कटआऊट पोस्‍टर संस्‍कृतीमधून प्रेरणा घेत
St+artने स्‍थानिक गोवाकरांच्‍या ८ पोट्रेट्सची सिरीज तयार केली आहे. यामध्‍ये शहरापासून
विमानतळापर्यंतच्‍या मार्गांवर लोकांचे अभिवादन करण्‍यात येईल. फक्‍त लोकप्रिय
व्‍यक्तिमत्‍त्‍वांसाठी मर्यादित असलेल्‍या माध्‍यमाच्‍या माध्‍यमातून स्‍थानिक
गोवाकरांची प्रशंसा करणे हा या प्रकल्‍पाचा मुख्‍य हेतू आहे. मुंबईमधील बॉलिवुड पोस्‍टर
आर्टिस्‍ट्सने ही ४० फूट उंच कटआऊट्स पेन्‍ट केली आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत नावाजल्या
गेलेल्या या आर्टिस्ट्सचा उदरनिर्वाहच डिजिटल प्रिंटिंग सुरू झाल्‍यामुळे बंद पडला.
म्‍युरल्‍स
भारतीय व आंतरराष्‍ट्रीय म्‍युरालिस्‍ट्स मोठ्या आकाराचे म्‍युरल्‍स पेन्‍ट करण्‍यासाठी
आणि गोवा शहराचा आनंद लुटण्यासाठी इथे आले आहेत. यंदा डिसेंबरमध्‍ये म्‍युरल्‍सची
निर्मिती करण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आलेले काही आर्टिस्‍ट्स आहेत पराग सोनघरे
(भारत), गाइडो वॅन हेल्‍टन (ऑस्‍ट्रेलिया) आणि क्‍युरियोट व रोमिना रोमानेली (लॅटिन
अमेरिकन जोडी).
प्रोव्‍हर्ब प्रकल्‍प
म्‍हणी या शहापणाचे बोल असतात. काही म्हणी पिढ्यानपिढ्या चालत आल्‍या आहेत. तरुण
व वृद्ध पिढींमध्‍ये संवाद वाढवण्‍यासाठी St+art ने साइन पेन्टिंग आर्टिस्‍ट्सना आमंत्रित
केले आहे. हे आर्टिस्‍ट्स प्रेक्षकांना आकर्षून घेण्‍यासाठी गोव्‍यामधील म्‍हणींना चित्ररुप
देतील. दुपारची वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे शहरातील अनेक दुकाने बंद असतात. त्‍यांपैकी
काही कायमस्‍वरुपी बंद आहेत. यामुळे St+art टीमला म्‍हणींसाठी हा एक कॅनव्हासच
उपलब्ध झाला आहे. प्रोव्‍हर्ब प्रकल्‍प जिज्ञासा निर्माण करण्‍यासाठी आणि तरुण व
वृद्धांमध्‍ये संवाद सुरू करण्‍यासाठी द्विमार्गी संधी देतो. तसेच या कलाप्रकारामधून साइन
पेन्टिंगला चालना मिळते. प्रोव्‍हर्ब प्रकल्‍पामध्‍ये देशभरातील निपुण पेन्‍टर्स व साइन
पेन्‍टर्स सहभागी झाले आहेत. हे पेन्‍टर्स स्‍थानिक लोकप्रिय म्‍हणींना कोकणी भाषेमध्‍ये
पेन्‍ट करतील.
ए४ आर्ट प्रकल्‍प
एसएएफ २०१७चा भाग म्‍हणून St+art ग्राफिक डिझाइनर्सना गोवाबाबत त्‍यांचे मत
व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमंत्रित करेल. ही मते ए४ आकराच्‍या पोस्‍टर्सवर संपूर्ण शहरभरात
सादर करण्‍यात येतील. ए४ पेपरचा विध्‍वंस थांबवण्‍यासाठी ए४ आर्ट प्रकल्‍प सुरू

करण्‍यात आला आणि या विध्‍वंसाचे प्रमाण आमच्‍या शहरी भागांमध्‍ये सर्वाधिक आहे.
पीजी फॉर बॉईज, वर्क फ्रॉम होम यांसारख्‍या पेस्‍ट केलेल्‍या फ्लायस्रसह विविध ग्राफिक
आर्टिस्‍ट्सना या प्रकल्‍पामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले आहे.
गुरिला प्रोजेक्‍शन्‍स
पुढील काही आठवड्यांसाठी St+art शहराभरात गुरिला प्रोजेक्‍शन्‍स राबवणार आहे. पोर्टेबल
मशिनरी सोबत घेऊन जाऊन प्रोजेक्‍शनच्‍या माध्‍यमातून इमारतींच्‍या भिंतींवर चित्रपट,
कलाकृती, टेक्‍स्‍ट्स, ग्राफिटी दाखवण्‍यात येतील. ज्‍यामुळे इमारती एखाद्या
चित्रपटगृहाप्रमाणे वाटतील, ज्‍यामधून कलेसंबंधी संदेश पसरवण्‍यात येईल आणि रात्रीच्‍या
वेळी व्हिज्‍युअल दृश्‍यांच्‍या माध्‍यमातून कलेचे प्रदर्शन केले जाईल. यासाठी टू बसराइड
स्‍टुडिओने भूमिगत आर्टिस्‍ट डाकूसोबत सहयोग जोडला आहे. तो नवीन मीडिया
माध्‍यमाच्‍या क्षमतांना सादर करेल, जे त्‍याला अगदी कुशलतेन येते आणि तो प्रेक्षकांना
अचंबित करेल.
St+art इंडिया फाउंडेशनविषयी
St+art इंडिया फाउंडेशन ही संस्था ‘सर्वांसाठी कला’ या तत्वार उभी असून सार्वजिनक जागांवर
कलाप्रकल्प उभे करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गासाठी कला उपलब्ध
व्हावी यासाठी तिला गॅलर्‍यांचा पारंपरिक अवकाशातून बाहेर काढून शहरातील राहत्या
विश्‍वाचाच एक भाग बनविण्याचा व त्यायोगे कलेचे खर्‍या अर्थाने लोकशाहीकरण करीत
तिला सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ही संस्था करत असते.
गेल्या ३ वर्षांमध्ये फाउंडेशनने ६ St+art उपक्रम आयोजित केले असून दिल्ली, मुंबई, बेंगळुरू
आणि हैदराबादमध्ये अनेक सार्वजनिक कला प्रकल्प साकारले आहेत. हे प्रकल्प आज त्या त्या
शहरांची मानचिन्हे बनले आहेत. या कलामहोत्सवाच्या प्रत्येक नव्या पर्वामध्ये व सार्वजनिक
कलाजिल्ह्यांच्या रुपाने नागरी संस्कृतीचे एक अंग बनून राहू शकतील अशाप्रकारचे
चोखंदळपणे केलेल कलात्मक प्रयोग साकारले जातात. अशाप्रकारच्या कलात्मक हस्तक्षेपांमुले
कलेसाठी पर्यायी अवकाश तयार होतात व सार्वजनिक अवकाशाचा कलात्मक वापर कसा
करता येईल याची वेगळी जाण लोकांना येते. भारतामध्ये नागरी कलेला एका चळवळीचे रूप
देण्यास कारणीभूत ठरलेल्या या फाउंडेशनसाठी असे कलात्मक प्रयोग म्हणजे शहरांच्या
रस्त्यांनाच कॅनव्हास म्हणून कलाविष्कारासाठी वापरत दृश्यस्वरूपातील सर्जनशीलता मूर्त
करण्याचा प्रयत्न आहे.
एशियन पेंट्सबद्दल…
१९४२ साली स्थापना झाल्यापासूनच एशियन पेंट्स ही भारतातील प्रथम क्रमांकाची व
आशियातली चौथ्या क्रमांकाची रंग उत्पादक कंपनी आहे. यांचा वार्षिक व्यापार १७०.८५अब्ज

रुपये इतका आहे. एशियन पेंट्स ही कंपनी जगातल्या १९ देशांमध्ये कार्यरत असून २६
उत्पादन केंद्रांच्या कक्षात यांची ६५ देशांत ग्राहक सेवा केंद्रे आहेत. कलर आयडिया, होम
सोल्यूशन्स, कलर नेक्स्ट आणि कीड्स वर्ल्ड यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांतून एशियन
पेंट्स ही देशातल्या रंग उद्योगातली अग्रेसर कंपनी ठरली आहे.