LGBT प्राईड राइडला गोव्यात प्रतिसाद

0
914

पणजी: लेस्बियन,गे, बाय सेक्शुअल,आणि ट्रांस जेंडर लोकांना समाजाने अजुन पूर्णतः स्वीकारलेले नाही.समाजाकडून होणारी हेळसांड थांबावी आणि प्रेमाने स्वीकारावे अशी अपेक्षा बाळगत गोव्यातील एलजीबीटीच्या जवळपास 300 सदस्यांनी पणजी बस स्थानक ते मीरामार किनाऱ्या पर्यंत प्राईड राइड काढून लोकांचे लक्ष वेधुन घेतले.प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते अशा घोषणा देत जेव्हा ही मंडळी जात होती तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जात होते.या प्राईड राइड मध्ये काही विदेशी नागरिक देखील सहभागी झाले होते.