I-Tech देणार K-12 विभागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन आयटी शिक्षण

0
231

भारतातील ऑनलाईन एज्युकेशन सेगमेंट अंदाजे 2 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे

गोवा खबर : 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य जोपासण्याची कल्पना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये करण्यात आली आहे. तथापि, शिकवलेल्या आणि शिकलेल्या कौशल्यांमध्ये एक मोठं अंतर आहे, परंतु विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संबंधित प्रशिक्षण दिले गेले तर हे अंतर कमी करता येईल. या उद्देशाने IANT ने आय-टेक (I-Tech) ची स्थापना केली आहे. हे इयत्ता 6 वी ते 12 वी (विज्ञान, वाणिज्य आणि कला प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी 100% ऑनलाईन आयटी कौशल्य देणारे प्रशिक्षण मंच आहे.

आय-टेक, या अभ्यासक्रमात कोडिंग, आयटी फंडामेंटल्स, क्लाउड कम्प्यूटिंग, सायबर सेक्युरिटी, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, पायथन इत्यादी आणि संज्ञानात्मक शिक्षण (Cognitive Learning) – स्वत: चे संवर्धन, माईंड मॅपिंग, सामान्य ज्ञान इत्यादी तंत्रज्ञान कौशल्यास एकत्र करेल. सदर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणास एक नवीन आयाम जोडेल, जे त्यांच्या वर्गातील शिक्षणाशी सुसंगत देखील असतील.

राज्य बोर्ड, सीबीएसई किंवा आयसीएसई मधील विद्यार्थी हे अभ्यासक्रम घेऊ शकतात. येत्या काही वर्षांत सर्व विद्यार्थ्यांसाठी आयटी शिक्षण आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थी खाजगी शाळेत शिकतो किंवा सरकारी शाळांमध्ये, मराठी माध्यम असो वा गुजराती माध्यम, हिंदी माध्यम किंवा इंग्रजी माध्यमात शिकत असो, हे महत्वाचे राहणार नाही.
IANT ची व्यवस्थापकीय संचालक भक्ती ओझा खेरानी म्हणते- “कौशल्ये आणि ज्ञानाचे संयोजन म्हणजेच या अभ्यासक्रमाची सामग्री आहे तसेच भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन याला तयार केले गेले आहे. यशस्वी कारकीर्द मिळविन्यासाठी, पुढे जाणे, या कौशल्यांनी सुसज्ज असणे फार आवश्यक ठरणार आहे. ”

आय-टेक अभ्यासक्रम चार विभागांमध्ये विभागले गेले आहेत – इयत्ता 6 वी आणि 7 वी साठी आय-टेक ज्युनिअर, इयत्ता 8 वी व 9 वी साठी आय-टेक सीनिअर, इयत्ता 10 वी ते 12 वी साठी आय-टेक एक्स्पर्ट तर इयत्ता 12 वी च्या पलीकडील वर्गांसाठी आय-टेक सुप्रीम. विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञाना ला एकत्र करून विद्यार्थ्यांना त्यांच्या वास्तविक जीवनात मदत करेल असा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे.

भारतात वर्ग 6 वी ते 12 वी मध्ये जवळ-जवळ 180 दशलक्ष (18 कोटी) मुले आहेत. IANT, वर्ग 3 री ते आयटी शिक्षणापर्यंत प्रशिक्षण वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, जे संभाव्य विद्यार्थ्यांची संख्या वाढवून 210 दशलक्ष (21 कोटी) पर्यंत करेल. या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी IANT चे 25,000 डिजिटल फ्रँचायझी उभारण्याचे उद्दीष्ट आहे, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.

हे अभ्यासक्रम ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे शिकवले जातील. यासाठी बॅचेस सुद्धा मर्यादित असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीस्कर भाषेत शिकवले जाईल.

सरकारच्या डिजिटल पुढाकार, वाढता स्मार्टफोन बेस, इंटरनेटचे वाढते उपयोग, तरुण लोकसंख्या, ऑनलाइन शिक्षणाचा तुलनेने कमी खर्च आणि इतर बाबींमुळे भारतीय ऑनलाइन शिक्षणाचे क्षेत्र अंदाजे 2 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचले आहे.