गोवा खबर डॉट कॉमबद्दल
गोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश-विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. डिजिटल युगात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या डिजिटल इंडियामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी गोवा खबर डॉट कॉम या वेब न्यूज पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या या उपक्रमाला समाजातील मान्यवरांचे आशीर्वाद आणि मदतीचा हात मिळत जाईल, याची आम्हाला खात्री वाटते.
गोवा खबर डॉट कॉमवर आम्ही माहितीचा खजिना घेऊन वाचकांच्या भेटीला क्षणोक्षणी येणार आहोत. या वेबपोर्टलला कोणत्याही भाषेचे बंधन असणार नाही. मात्र या वेबसाइटवरून व्यक्त झालेल्या सगळ्याच मतांशी संपादक म्हणून आम्ही सहमत असूच असे नाही. सबका साथ, सबका विकास हेच सूत्र धरून नव्या डिजिटल व्यासपीठाद्वारे आम्ही जागतिक वाचकांसमोर येत आहोत. आपल्या साथीची, सहकार्यची आणि हिट्सची आम्हाला अत्यंत गरज आहे.
आपला
एडिटर इन चिफ