Commonwealth Games 2018: मिराबाई चानूकडून भारताला पहिले सुवर्ण पदक

0
1465

गोवाखबर:  मिराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले  आहे. ४८ वजनी गटात मिराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. चानूने पहिल्या प्रयत्नात ८० किलो वजन उचलले. यानंतर तिने ८४ आणि ८६ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.