Common wealth Games 2018:वेटलिफ्टिंगमध्ये गुरूराजाला रौप्य पदक

0
1290

कॉमनवेल्थ गेममध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या गुरू राजा यांनी 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची करत भारताचं खातं उघडलं आहे. 28 वर्षीय गुरू राजा यांनी 249 किलोचं वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. गुरूराजा यांनी 111 किलो वजन उचललं नंतर तिसऱ्या फेरीत 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी गुरू राजा यांनी केली. शेवटच्या फेरीत 249 किलो वजन उचलत गुरू राजा यांना रौप्य पदक मिळालं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.