Big Breaking:मुख्यमंत्र्यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज

0
892
गोवा:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना आज सायंकाळी गोमेकॉमधून डिस्चार्ज मिळाला. गेले 5 दिवस ते डीहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाच्या तक्ररी नंतर गोमेकॉमध्ये उपचार घेत होते.सोमवार पासून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयात येऊन काम सुरु करण्याचे ठरवले होते.त्यापूर्वीच रविवारी त्यांना डीहायड्रेशन आणि  कमी रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. स्वादू पिंडाच्या विकारावर त्यांच्यावर मुंबई मध्ये लीलावती हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.22 फेब्रूवारी रोजी बजेट सादर करण्यासाठी पर्रिकर डिस्चार्ज घेऊन विशेष विमानाने गोव्यात दाखल झाले होते.पर्रिकर यांची प्रकृती ठीक नसल्याने 22 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 4 दिवसांचे करण्यात आले होते.पर्रिकर लवकर बरे व्हावेत यासाठी राज्यभर प्रार्थना,होम हवन सुरु आहेत.पर्रिकर गोमेकॉ मधून डिस्चार्ज मिळाल्या नंतर आपल्या दोनापावल येथील घरी गेले आहेत.पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा लीलावती हॉस्पिटल मध्ये नेले जाण्याची शक्यता आहे.

पर्रिकर यांनी ट्वीट करून व्यक्त केला आनंद
गोमेकॉ मधून डिस्चार्ज मिळताच मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ट्वीट करून घरी येऊन खुप आनंद झाला.आपल्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी आभारी.तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा! अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.