Big Breaking:काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी

0
1017

गोवाखबर:काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला आहे तर अभिनेता सैफअली खान, सोनाली बेंद्र,तब्बू यांची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 20 वर्ष जुन्या खटल्यात आज जोधपूर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे.

वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये ’हम साथ साथ है’ चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. सलमानने काळवीटाची शिकार केली तेव्हा त्याच्यासोबत अभिनेता सैफअली खान, सोनाली बेंदे , तब्बू हेदेखील होते. त्यामुळे हे सर्वजण या खटल्यातील सहआरोपी होते. आज जोधपूर न्यायलयात झालेल्या सुनावणीत सलमानला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे सलमानला आता 1 ते सहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.