Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्रिपदासाठी भंडारी समाजातील उमेदवार निवडण्याचा ‘आप’चा निर्णय योग्य : वाल्मिकी नाईक

Published

on

Spread the love
गोवा खबर:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती गुरुवारी आम आदमी पक्षाने पणजी येथील कार्यालयात साजरी केली. 
पक्षाच्या नेत्यांनी आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आणि मोठ्या अभिमानाने पुष्पहार अर्पण केला. पक्षश्रेष्ठींनी प्रख्यात नेते डॉ. आंबेडकर यांची समाजसेवेची संकल्पना पुढे नेण्याची शपथ घेतली.
‘आप’चे नेते राजदीप नाईक म्हणाले की आंबेडकरांचा विश्वास होता की जेव्हा वंचित लोकांना शिकण्याचा हक्क आणि सत्तेत सहभाग घेण्याचा हक्क मिळेल तेव्हा ते गुलामगिरी आणि अन्याय या विळख्यात अडकणार नाहीत. दिल्ली आणि पंजाबमधील आप सरकार वंचित गटांच्या उत्थानासाठी या दोन पद्धतींचा अवलंब करत आहे”.
नाईक  म्हणाले, “शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली सरकारने अप्रतिम काम केले आहे. चांगले गुण मिळवणे आणि प्रशस्तीपत्र मिळवणे म्हणजे शिक्षण नाही. त्यासोबतच मुलांची मानसिकता बदलली पाहिजे. हेच आप पक्ष आनंद, उद्योजकता आणि देशभक्ती अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करून साध्य करत आहे.”
आपचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, “आंबेडकरांचा असा विश्वास होता की जेव्हा वंचित गटांतील लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी होतील तेव्हा ते सक्षम होतील. आज दिल्लीत आपचे 62 आमदार आहेत आणि त्यापैकी 12 आमदार दलित समाजातील आहेत”.
निवडणुकीनंतर अनेकांनी ‘आप’ची भंडारी समाजाची मुख्यमंत्री रणनीती फसल्याची प्रतिक्रिया दिली. नाईक म्हणाले, “आम्ही भंडारी समाजातून आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडला याचा आम्हाला आनंद आहे. शेवटी आंबेडकरांचा असा विश्वास होता की उपेक्षित समाजाला सत्तेत प्रवेश दिल्यास ते बळकट होतील, आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले. जर ‘आप’ने निवडणूक जिंकली असती तर आज भंडारी समाजातील व्यक्तीने गोव्याच्या भल्यासाठीच काम केले असते”.
आपचे उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे म्हणाले, “आप’ हा देशातील एकमेव पक्ष आहे जो केवळ आंबेडकर जयंतीच्या दिवशीच नव्हे तर वर्षभर बाबा आंबेडकरांच्या शिकवणीवर चालणारा पक्ष आहे. आंबेडकर हे शोषितांचा आवाज होते आणि त्यांनी आपले जीवन शोषितांच्या उत्थानासाठी समर्पित केले”.