गोवा खबर:उर्वरित 3 मंत्र्यांचे खाते वाटप करण्या बरोबर आज महामंडळाचे वाटप देखील करण्यात आले आहे.सरकारला पाठिंबा दिलेल्या तिन्ही अपक्षांची वर्णी महामंडळावर लावण्यात आली आहे.
मंत्री पदाची आस लावून बसलेल्या म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांची पुन्हा एकदा जीएसआयडीसीचे उपाध्यक्षपद देऊन बोळवण करण्यात आली आहे. ‘एनजीपीडीए’ माजी मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्याकडे सोपवून महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना खुश करण्यात आले आहे.
मंत्रीमंडळातील दोन नंबरचे मंत्री विश्वजीत राणे यांची पत्नी दिव्या राणे यांची वन महामंडळावर वर्णी लावण्यात आली आहे.विशेष म्हणजे विश्वजीत यांच्याकडेच आहे. खादी उद्योग अपक्ष आमदार आंतोनियो वाझ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
पर्यटन विकास महामंडळ हंगामी सभापती बनवलेल्या गणेश गावकर यांच्याकडे तर मंत्री पदासाठी चर्चेत असलेल्या आलेक्स रेजिनाल्ड यांच्याकडे वजनदार औद्योगिक विकास महामंडळ सोपवण्यात आले आहे. फलोत्पादन मये मतदारसंघाकडेच देत प्रेमेंद्र शेट यांची त्यावर वर्णी लावण्यात आली आहे. नावेली मध्ये जायंट किलर ठरलेल्या उल्हास तुयेकर यांच्याकडे कदंब महामंडळाचे स्टेयरिंग तर मंत्री पदासाठी आक्रमक झालेल्या प्रवीण आर्लेकर यांच्याकडे हस्तकला महामंडळ सोपवण्यात आली आहे.याशिवाय माहिती-तंत्रज्ञान- डॉ. चंद्रकांत शेट्ये, गृहनिर्माण महामंडळावर जीत आरोलकर.तर ‘एसजीपीडीए’ दाजी साळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.