Connect with us

गोवा खबर

सहाव्या ‘दि लक्जरी सिम्पोझियम २०२२’ची गोव्यात सांगता

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:दि लक्जरी सिम्पोझियम २०२२च्या सहाव्या पर्वाची सांगता केंद्रीय संस्कृती व विदेशी व्यवहार मंत्री माननीय श्रीमती मीनाक्षी लेखी तसेच काँगोच्या राणी माननीय दियाम्बी काबतुसुइला यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यादरम्यान दि लक्जरी लीगच्या वतीने २६ व २७ मार्च २०२२ रोजी दि शोकेस२०२२ची तिसरी फेरीही आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमास केंद्रीय पर्यटन मंत्रालय तसेच केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांचे सहकार्य लाभले.

“भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या खूप श्रीमंत देश अशून प्रत्येक भारतीय त्याच्या किंवा तिच्या क्षमेतप्रमाणे एक डिझायनर बनू शकतो. मला विश्वास आहे की लक्जरी सिम्पोझियमद्वारे भारतातील ही विविधता, अलिशानपणाची संस्कृती जगासमोर वेगवेगळ्या रूपात यशस्वीपणे सादर करेल”, असे प्रतिपादन केंद्रीय संस्कृती व विदेशी व्यवहार मंत्री माननीय श्रीमती मीनाक्षी लेखी यांनी यावेळी केले.

“भारताच्या संदर्भात अलिशानपणाबाबत नव्याने कल्पना करण्यास आम्ही प्रोत्साहन दत आहोत. भारतीय कला आणि कारागिरीच्या माध्यमातून अलिशानपणा हा बदलाचा एक सशक्त असा प्रतिनिधी असल्याचा विचार दि लक्जरी लीगद्वारे पेरला जात आहे. आपली कलाकौशल्य आणि ब्रँड सादर करून भारताचा आवाज आणखी बुलंद करण्याचा आमचा ध्यास आहे,” अशी प्रतिक्रिया दि लक्जरी लीगच्या संस्थापिका रितू बेरी यांनी दिली.

दि लक्जरी लीग ही ना-नफा तत्त्वावर कार्यरत असलेली संस्था असून सांस्कृतिक वारसा ब्रँडिंगसाठी सर्वांत शक्तीशाली, परिणामकारक असा प्लॅटफॉर्म म्हणून ती ओळखली जाते. भारताचे जगभर ब्रँडिंग करण्याकामी लक्जरी कार्यरत आहे. भारतीय कला, कारागिरी आणि वारशाला प्रोत्साहन देण्यासाठी एक मानांकन-प्रेरक म्हणून हे फाउंडेशन काम करते. समविचारी लोक, अलिशानपणाचे शोधक, जागतिक विचारवंत आणि शासन यांच्यात संवादाच्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण करत सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करण्याच्या उद्देशाने हे फाउंडेशन काम करते.

या व्यासपीठावर एकत्र येत निर्णयकर्ते, कारागीर, कार्पोरेट वैश्विक ब्रँड, ग्राहक तसेच शासन यांनी जागतिक पातळीवर अलिशानपणाचे बदलते आयाम, नवी परिभाषा, पुनर्कल्पना करण्याबाबत ऊहापोह केला. हिल्टन गोवा रिसॉर्टमध्ये आयोजित टीएलएस२०२२ हा उपक्रम म्हणजे सौंदर्य, रचना, फॅशन आणि सर्जनशील कलाविष्कारांचा एक सांस्कृतिक सहयोग ठरला.

दि शोकेस २०२२:- भारताचा गौरव वाढवणाऱ्या ब्रँडना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्रचार करणे आणि जागतिक पातळीवर भारताचा आवाज बुलंद करणे हा या प्रदर्शन व्यासपीठाचा उद्देश आहे. यंदाच्या या उपक्रमात सौंदर्य, वस्त्रप्रावरणे, असेसरीज आणि विविध क्षेत्रातील जागतिक पातळीवरील ब्रँड सहभागी झाले होते.

 

लक्जरी लीगमध्ये आम्ही विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या नामवंत व्यक्तींचा गौरव केला. जागतिक पातळीवर यशस्वी कामगिरी करणे आणि आपापल्या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक नकाशावर ठळक करणे या कामाप्रती अशा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

लक्जरी सिम्पोझियम २०२२मध्ये आम्ही गोमंतकीय पार्कोज महिला म्हणून खालील मान्यवरांचा गौरव केला.

 • यलो मेहरा
 • निलिमा सूरज मोरजकर
 • दिविया कपूर
 • शेरील ओलिवेरा फर्नांडिस डिसा
 • सपना सरदेसाई
 • अनिशा हसन
 • स्वेतलाना कास्पर
 • पल्लवी धेम्पे
 • अर्चना भोबे
 • प्रभा चंद्रन
 • सिता रैना

Continue Reading