Connect with us

गोवा खबर

सरकारने सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासातील प्रगती जाहीर करावी : युवक काँग्रेस

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सिध्दी नाईक मृत्यूच्या तपासाची सद्यस्थिती गोव्यातील लोकांना सांगावी अशी मागणी गोवा प्रदेश युवक काँग्रेसने केली आहे. गोवा प्रदेश युवक काँग्रेसच्या सदस्यांनी शनिवारी सिद्धी नाईकच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि पीडितेला न्याय मिळवण्याच्या लढाईत त्यांच्यासोबत राहण्याचे आश्वासन देऊन सांत्वन केले.
गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर आणि इतर सदस्यांनी पीडितांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि सांगितले की सरकारने सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाच्या तपासात प्रगती केली पाहिजे. काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर, अखिलेश यादव, जनार्दन भंडारी, साईश आरोसकर, यश कोचरेकर, लिओविता पॅरेरा, अश्विन डी सूझा, प्रणव फडटे, शबी नाईक, साहिल कांबळे,  अन्नुक्षा दौरे, अक्षय कांबळे, केनिशा मिनेझिस, रेखा फर्नांडिस, वेलमा फर्नांडिस, सनीर शेख, निकिता वायंगडे, प्रभव म्हांब्रे, प्रशांत सोलयेकर आदी यावेळी उपस्थित होते.
म्हार्दोळकर म्हणाले, डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे.
अंजुनामध्ये पार्किंग ॲटेडंटच्या हत्येच्या प्रकरणाचा संदर्भ देत म्हार्दोळकर म्हणाले की, आता पर्यटकही गोव्यात येऊन आमच्या गोमंतकियांची हत्त्या करायला लागले आहेत. गोव्यात कायद्याचा भय नसल्याने हे घडत आहे.” असे ते म्हणाले.
“हे स्पष्ट आहे की सरकार गुन्ह्यांचा त्वरित तपास करण्यात आणि दोषींना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. पोलिसांची ही कृती गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारी आहे.” असे ते म्हणाले. ॲड. म्हार्दोळकर म्हणाले की, सिद्धी नाईक आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी ते लढा देतील.

Continue Reading