Connect with us

गोवा खबर

आप रोजगार यात्रा सांतआंद्रे येथे दाखल

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : आम आदमी पक्षाची रोजगार यात्रा, शनिवारी सकाळी सांतआंद्रे मतदारसंघात दाखल झाली. ही यात्रा कुडका पुलापासून सुरू झाली. कुडका मैदान, भाटी आणि अझोशी या परिसरातील रहिवाशांनी या रोजगार यात्रेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. बूथ स्तरावरील बैठकांना आसपासच्या नागरिकाची लक्षणीय उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित युवक युवतींनी  केजरीवाल यांच्या नोकरी हमी योजनेसाठी आपली नाव नोंदणी केली.
मागील निवडणुकांदरम्यान विद्यमान आमदार फ्रान्सिस्को सिल्व्हिरा,जे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते यांनी स्थानिक मतदारांचा विश्वासघात करीत भाजपमध्ये प्रवेश केला. आज जरी ते सत्ताधारी पक्षात असले तरी कोणताही विकास करणे त्याना शक्य झाले नाही. सांतआंद्रे मतदार संघात  तरुण आजही रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.सांतआंद्रे मध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. महामारीच्या काळातहि स्थानिक आमदार सिल्वेरा यांनी  पारंपारिक व्यवसायांना कोणतेही समर्थन दिले नाही. बरेच रहिवासी टॅक्सीचालक आहेत. महामारीमुळे त्यांनी उपजीविका गमावली आहे आणि त्यांना भाजप सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यातही आमदार अपयशी ठरले . अरविंद केजरीवाल यांनी पर्यटन मंदीमुळे प्रभावित टॅक्सीचालकांना सानुग्रह मदत म्हणून 5000 रु च्या उपक्रमाची माहिती अपच्या नेत्यांनी या प्रसंगी उपस्थिताना दिली .दिल्लीतील ‘आप’ने योग्य वेळी पावले उचलत या टॅक्सीचालकांना आधार दिला,गोमंतकीय जनतेच्या पाठीशी आम आदमी पक्ष ठामपणे उभा राहील असा विश्वास उपस्थितानी व्यक्त केला.  अरविंद केजरीवाल यांच्या कौशल्य विद्यापीठाच्या कल्पनेने येथील तरुण प्रभावित झाले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गोवा भेटीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर प्रत्येक युवकांना रोजगार देण्याची हमी जाहीर केली होती. प्रत्येक तरुणांना रोजगार दिला जाईल आणि रोजगार उपलब्ध होईपर्यंत दरमहा 3,000 रुपये दिले जातील असे त्यांनी आश्वासन दिले होते. केजरीवाल यांनी जाहीर केले की खाजगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. पर्यटन आणि खाणकाम बंद झाल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील. दिल्ली सरकार DSEU च्या धर्तीवर गोव्यात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करेल. आप गोव्यात सरकारी नोकऱ्यांमधील घराणेशाही संपुष्टात आणेल आणि नोकऱ्या सामान्य माणसाला उपलब्ध करून दिल्या जातील
सांतआंद्रे येथील या रोजगार यात्रेला सांतआंद्रे मतदार संघाचे आम आदमी पक्षाचे प्रभारी, नामदेव माशेलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
“सांतआंद्रे  येथील तरुण खूप निराश आहेत कारण येथील आमदाराने त्यांच्या रोजगाराची काळजी घेतली नाही. सरकारी नोकरीसाठी आर्थिक बळ हाच निकष हे सरकार लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी नोकऱ्या देताना सर्वच गोमंतकीयाना समान संधी लाभेल अस स्पष्ट करून आप कोणताही भेदभाव करणार नसल्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी उपस्थिताना दिली.  अरविंद केजरीवाल यांच्या वचनाने रहिवासी उत्साहित आहेत की जर आप सत्तेत आले तर प्रत्येक युवकाला रोजगार दिला जाईल आणि जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला दरमहा 3000 रुपये दिले जातील. अरविंद केजरीवाल यांनी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे 80 टक्के आरक्षण गोव्यातील तरुणांसाठी राखीव राहील या आश्वासनाला युवकांनीही खूप समर्थन दिले आहे. याव्यतिरिक्त, पर्यटन बंद झाल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना 5000 रुपये दिले जातील. अरविंद केजरीवाल एक माणूस म्हणून ओळखले जातात जो तो जे सांगतो ते करतो ”असे विचार नामदेव माशेलकर या प्रसंगी व्यक्त केले.

Continue Reading