Connect with us

गोवा खबर

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राजदीप नाईक आपमध्ये

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राजदीप नाईक यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. नाईक यांचे म्हणणे की ते केजरीवाल मॉडेलवर विश्वास ठेवतात आणि गोव्यासाठी हा एकमेव पर्याय आहे असे त्यांना वाटते. केजरीवाल यांच्या वीज आणि नोकरीच्या हमीमुळे नाईक प्रभावित झाले आहेत. वाढती बेरोजगारी आणि सध्याची परिस्थीती आणि लोकांच्या उपजीविकेवर महामारीमुळे होणारा परिणाम पाहता फक्त आप हाच पक्ष  गोवेकरांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे अस ते म्हणाले.
नाईक हे गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकलाकार आहे  .नाईक मूळचे सावई वेरे फोंडाचे आहेत, त्यांनी अगदी लहान वयातच कोंकणी चित्रपटात काम  आणि नंतर तियात्र शोची निर्मिती केली. त्याच्या अनेक नाटकांना पुरस्कार मिळाले आहेत . त्यांची निर्मिती गोव्यातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांनी कला आणि संस्कृती विभाग, गोवा यांच्यासह ‘नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यासाठी सहकार्य केले आहे. 2012 मध्ये त्यांना गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाने युवा सृजन पुरस्कार प्रदान केला.
राजदीपने आपल्या कामगिरी आणि कलाकृतींद्वारे गोव्यातील  संस्कृती आणि वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. नाईक जुलै महिन्यात सरकारवर टीका केल्याने चर्चेत होते, महामारीमुळे राज्य सरकारने त्यांनी राज्यातील कलाकारांना आर्थिक मदत म्हणून एक वेळ रु. १०००० ची मदत केली होती यावर त्यांनी आक्षेप घेतला होता १० हजाराच्या एक रकमेने कलाकार त्यांचे कुटुंब टिकवू शकेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता त्याच्या या प्रश्नांनंतर राजदीपच्या कारची तोडफोड करण्यात आली होती. गोवेकरांनी या हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला.
“अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. गेल्या दोन वर्षांत गोव्याने महामारी आणि संबंधित आर्थिक संकटामुळे खूप त्रास सहन केला आहे. आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने साथीच्या काळात गोवेकरांना मदत करण्याचे काम केले आहे अस राजदीप नाईक म्हणाले. “गोव्यातील तरुण आज नोकरीच्या शोधात आहेत पण भाजप सरकार हे पुरवण्यात अपयशी ठरले आहे, फक्त अरविंद केजरीवाल यांनी एक उपाय आणि ही समस्या सोडवण्याची योजना आणली आहे अस नाईक पुढे म्हणाले.
“मी राजदीप याचे गोव्याच्या आप टीममध्ये स्वागत करतो. त्यांच्यात गोव्यातील युवकांसाठी काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा आहे. मी त्यांच्यासोबत गोव्यातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

Continue Reading