Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मोठ्या उत्साहाने साजऱा करणेयात  येणाऱ्या दसऱ्याच्या, विजयादशमीच्या गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा आणि तो आपण  वाईट प्रवृत्तीवर सत्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा करतो. दसऱ्याच्या, विजयादशमीच्या उत्सवाने दहा दिवसांच्या नवरात्रा उत्सवाची सांगता होते. नवरात्रा उत्सवात महिषासूर सारख्या वाईट शक्तिचा नाश करणाऱ्या  दुर्गामाता देवीची आराधना केली जाते.

आज  विश्व कोवीड १९ महामारीमुळे पिडीत झाले असताना दसऱ्याचा उत्सव गोव्यातील लोकांना शांतता, भरभराट आणि चांगले आरोग्य घेऊन येवो .  अशा प्रसंगी आपण आपली भावना कायम ठेऊन कोवीड- महामारी विरूध्द  लढण्यासाठी योग्य सुरक्षा उपाय हाती घेऊया.

या वर्षाचा दसरा सण  सर्वांना शांतता, सलोखा आणि भरभराट घेऊन येवो. वाईट प्रवृत्ती दूर करून प्रकाशाकडे  वाटचाल करूया आणि राज्याच्या एकता आणि प्रगतीसाठी नव्याने प्रयत्न करूया  असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.

Continue Reading