Connect with us

गोवा खबर

विजेच्या खांबावरून अमित शहांचे बॅनर काढा : युवक काँग्रेस

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : गोवा प्रदेश युवक काँग्रेसने गोव्याच्या मुख्य विद्युत अभियंत्याला निवेदन सादर केले असून, भारतीय जनता पक्षाने विजेच्या खांबावर अमित शहा यांचे लावलेले बॅनर आणि पोस्टर्स काढण्याची विनंती केली आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी गुरुवारी निवेदन सादर केले आणि भाजपवर कारवाई करण्याची मागणी केली. तद्‌नंतर त्यांनी पणजीतील विद्युत भवनाबाहेर पत्रकार परिषद घेवून ही मागणी केली. यावेळी काँग्रेस नेते जनार्दन भंडारी, साईश आरोसकर आदी उपस्थित होते.
भाजपने बॅनर प्रदर्शित करण्याची परवानगी मागितली होती का, याचे उत्तर देण्यात सरकारी अधिकारी अपयशी ठरले आहेत. यामुळे हे अधिकारी भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा मुख्य विद्युत अभियंताने  या विषयावर मौन बाळगले होते. ” असे ॲड  म्हार्दोळकर म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बॅनर आणि पोस्टर्स विमानतळ- ते कूर्टी फोंडा आणि धारबांदोडा पर्यंत, आणि फोंडा आणि वास्को येथून पणजीच्या वाटेवर लावले आहेत. अमित शाह यांच्या गोवा भेटीवर त्यांचे स्वागत करण्यासाठी हे बॅनर्स लावले आहेत, परंतू सरकारी मालमत्तेचा वापर करणे हे चुकीचे आहे असे म्हार्दोळकर म्हणाले.
अॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि अमित शाहला खूश करण्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर केला आहे. ‘‘पोस्टर्स आणि बॅनर लावण्यासाठी विजेचे खांब वापरण्याची परवानगी नाही.’’ असे ते म्हणाले.
“मी विद्युत विभागाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या अभियंत्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना विद्युत खांबावर लावलेले सर्व होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि इतर बॅनर त्वरित हटवावेत.” अशी मागणी त्यांनी केली.
म्हार्दोळकर म्हणाले की, भाजपने या कृतीतून आपली दादागिरी संस्कृती दाखवली आहे आणि यासाठी गोव्यातील लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले. “राजकीय फायद्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर करणे योग्य नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी भाजपच्या दबावाखाली न येता कारवाई केली पाहिजे. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.

Continue Reading