Connect with us

गोवा खबर

लोक सेवेसाठी सरकार तुमच्या दारी

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी लोकांच्या दारात मूलभूत सुविधा आणि सरकारी योजना पुरवणे हे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे सांगितले. आज एमईएस कॉलेज झुआरीनगर येथे मुरगांव तालुक्यासाठी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की राज्य सरकार नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यास वचनबद्ध आहे म्हणून सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम लोकांना सेवा देताना प्रशासकीय व्यवस्थेतील विविध समस्या आणि कमतरता ओळखण्यासाठी आणि समस्या लगेच सोडविण्यासाठी संकल्पित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला आतापर्यंत लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे  काही ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयांना वारंवार भेट न देता त्यांची कामे पूर्ण होत असल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यात येते असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांनी पुढे माहिती दिली की हा कार्यक्रम सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाशी संबंधित आहे ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात स्थानिक रोजगार आणि स्वयंपूर्ण जीवनशैली निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांची यावेळी भाषणे झाली . आमदार अलिना सालढाणा, कार्लोस आल्मेदा, अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कात्याल, आयएएस यावेळी उपस्थित होत्या.

सरकारच्या विविध योजना आणि सेवा एकाच छताखाली वितरित करण्यासाठी ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रम एकत्रितपणे तयार करण्यात आला आहे ज्यामध्ये विविध सरकारी खाते नागरिकांना मदत आणि सहकार्य देत आहेत.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कोविड पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुरगाव तालुक्याच्या स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत नियुक्त केलेल्या स्वयंपूर्ण मित्राची आढावा बैठक घेतली आणि प्रत्येक पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात केलेल्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी समस्या मुक्त सेवा देण्यासाठी खाते प्रमुखांशी संवाद साधला.

उद्घाटनाचे सूत्रसंचालन मुरगांवचे नगराध्यक्ष श्रद्धा महाले यांनी केले आणि संदीप सूद यांनी आभार मानले.

Continue Reading