Connect with us

गोवा खबर

टोनी रॉड्रिग्ज यांनी साधला ओडशेलवासीयांशी संवाद

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 
गोवा खबर : ताळगावमध्ये कार्यालय सुरु केल्यानंतर काँग्रेस नेते टोनी रॉड्रिग्ज यांनी आजपासून प्रचारास सुरुवात केली. आज दोनापावल येथील ओडशेल भागात घरोघरी जाऊन रॉड्रिग्ज यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.
यावेळी माजी महापौर उदय मडकईकर, माजी नगरसेवक दया कारापुरकर, ताळगाव मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर गोवेकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ताळगाव मधील समस्या सोडवण्या बरोबर शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास रॉड्रिग्ज यांनी ओडशेलवासीयांशी संवाद साधताना व्यक्त केला. आज सकाळी रॉड्रिग्ज यांनी ताळगाव मधील भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार येऊ नये यासाठी हार्वेस्टिंग मशीनचा शेतकऱ्यांचा खर्च आपण उचलणार असल्याचे सांगत प्रत्यक्ष मदतीला सुरुवात देखील केली.

Continue Reading