Connect with us

गोवा खबर

आपने सुरू केली रोजगार यात्रा!

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • हळदोणे येथे भव्य सभा
गोवा खबर : हळदोणे येथे आम आदमी पार्टीने आपली रोजगार यात्रा सुरू केली. या नंतर झालेल्या सभेला १०० हून अधिक स्थानिकांनी उपस्थिती लावली.पक्षाने रोजगार हमी तळागाळापर्यत पोहचविण्यासाठी कंबर कसली आहे.या दरम्यान कोपरा बैठका आणि घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला जात आहे तसच केजरीवाल यांच्या रोजगार हमी योजनेची माहिती दिली जात आहे राज्यात प्रथमच एक राजकीय पक्ष बेरोजारीच्या मुद्यावर आक्रमकपणे काम करत आहे.
गेल्या महिन्यात अरविंद केजरीवाल गोव्यात आले होते त्यांनी राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक तरुणांना रोजगार देण्याची हमी दिली होती. ते म्हणाले की, आप सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक युवकाला रोजगार दिला जाईल आणि जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला दरमहा 3,000 रुपये दिले जातील. त्याच प्रमाणे खाजगी क्षेत्रातील  80 टक्के नोकऱ्या गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. पर्यटन आणि खाणकाम बंद झाल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील. दिल्ली सरकार DSEU च्या धर्तीवर गोव्यात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करेल. ते पुढे म्हणाले की, आम आदमी गोव्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये सुसूत्रता आणेल.
आज आम आदमी पक्षाने रोजगार हमी गोव्यात तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दुरुष्टीने पाउल उचले आहे. गोव्यामध्ये  केजरीवाल यांच्या  रोजगाराच्या मॉडेलबद्दल चर्चा सुरु असताना पाणी  वीज, शाळा आणि आरोग्य सेवेच्या मॉडेलवर अनेकजण प्रभावित झाले आहेत. त्यामुळे आम आदमी पक्ष गोव्याच्या भविष्यासाठी एकमेव पर्याय म्हणून पाहिला जात आहे. गोव्यातील तरुण नोकऱ्यांच्या फसव्या आश्वासनामुळे कंटाळले आहेत या पार्श्वभूमीवर आम आदमी  नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणेल याबद्दल उत्साहित आहे. बेरोजगार युवकांच्या कुटुंबाला  ३००० रुपयांच्या बेकारी भत्तेचे स्थानिकांनी स्वागत करून सावंत सरकार कशी अपयशी ठरली आहे यावर भाष्य केल.
बैठकीला उपस्थित असलेल्या तरुणांनी कौशल्य विद्यापीठ बाबत प्रश्न विचारले. स्पर्धात्मक जगात अस्तितवात असलेला अभ्यासक्रम कमी पडत असल्याने चिंता व्यक्त केली . सावंत सरकारच्या अभ्यासक्रमांनी रोजगारक्षम कौशल्याकडे दुर्लक्ष केले आहे. कालच युनेस्कोच्या एका अहवालात असे म्हटले आहे की गोव्यातील बहुतेक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळाही नाहीत.
गोवेकर मोठ्या संख्येने आमच्या सभांमध्ये सामील होत आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण नोकऱ्या गमावल्यामुळे किंवा युवकांसाठी नवीन रोजगार निर्माण न केल्याने सावंत सरकारवर नाराज आहेत,” असे हळदोणे विधानसभा प्रभारी ब्रूनो फर्नांडिस  म्हणाले.

Continue Reading