Connect with us

गोवा खबर

मयेमध्ये भाजपविरोधात आरजी रिंगणात 

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : बुधवारी म्हावलींगे येथे आर जीची कोपरा बैठक पार पडली. रिवोल्युशनरी गोवन्स च्या मये गटाने ही बैठक आयोजित केली होती. येथे आर जी प्रमुख मनोज परब व मये मतदार संघाचे नेते श्रीकृष्ण परब उपस्थित होते.
रिव्होल्युशनरी गोवन्सचे सदस्य श्रीकृष्ण परब यांनी आरोप केला की गेल्या 15 वर्षांपासून मये मतदारसंघातील भाजपचे आमदार विकासाची गती राखण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. भाजपचे मयेचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये आणि त्यांच्या आधी अनंत शेट ज्यांनी दोन वेळा काम केले, त्यांना निवडून दिलेल्या लोकांना अपयशी ठरवले. मूलभूत सुविधा जसे की वीज, पाणी, चांगले रस्ते, सरकारी शाळा, यासारख्या गोष्टी या भागातील लोकांसाठी दूरचे स्वप्न राहिले आहेत. सलग तीन वेळा भाजपचा आमदार मये मतदारसंघात निवडून आला आहे.
“हे पाहून वाईट वाटते की आमच्या बहुतांश आमदारांना साधे रस्ते नीट करता येत नाहीत. मागील १५ वर्षे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आम्ही आश्वासन देतो की आरजी लोकांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढतील, ”श्रीकृष्ण यांनी म्हावळींगे येथे सातेरी मंदिरात 300 लोकांच्या मेळाव्याला संबोधित करताना सांगितले.
मनोज परब मत मांडतात की सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाण अवलंबितांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. मये आणि पीळगाव पंचायत क्षेत्रातील लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे कारण मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीमुळे लोकांना घरखर्च करण्यास देखील परवडत नाही. मतदारसंघात स्थानिकांना भेडसावणारी ही मोठी समस्या असूनही, येथील MNC मध्ये कोणत्याही स्थानिकांना सांभाळून घेतले जात नाही. अश्या कंपन्या कार्यरत आहेत परंतु स्थानिकांना येथे रोजगार दिला जात नाही.
“खाणीवर बंदी घातल्यानंतर आलेल्या समस्यांबाबत स्थानिकांनी अनेक वेळा आमदारांशी संपर्क साधला आहे परंतु त्यांची विनंती बधिरांच्या कानावर पडलेली दिसते. खाण अवलंबितांच्या सुरक्षेसाठी अजिबात काहीच केले गेले नाही आणि मयेआमदार लोकांच्या समर्थनासाठी बाहेर आले नाहीत. लोकांच्या एकवटीसाठी मी त्यांचे कौतुक करतो आणि आगामी निवडणुकीत बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही काम करा असे आवाहन करतो,” ते म्हणाले.
“हे निवडून आलेले प्रतिनिधी राजांसारखे वागतात आणि स्थानिकांना गृहीत धरतात. स्थानिक आमदार ऊपलब्ध नाहीत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहेत. यावेळी मयेमध्ये आरजी आणि भाजप यांच्यात लढत होईल. इतर कोणालाही येथे संधी नाही असे परब म्हणाले.

Continue Reading