Connect with us

गोवा खबर

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ वर्षांचा अर्धवेळ एमई (औद्योगिक अभियांत्रिकी) कार्यक्रम

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : फर्मागुडी-फोंडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ वर्षांचा अर्ध वेळ मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (औद्योगिक अभियांत्रिकी) कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई), नवी दिल्लीने मंजूर केलेल्या ३ वर्षांच्या अर्ध वेळ मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (औद्योगिक अभियांत्रिकी) हा कार्यक्रम गोवा विद्यापीठाशी संलग्न आहे.

हा अनोखा एमई कार्यक्रम खास गोवा राज्यात काम करणाऱ्या अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी आहे. हे वर्ग संध्याकाळी आयोजित केले जातात जेणेकरून विद्यार्थी कामाच्या तासांनंतर वर्गांना उपस्थित राहू शकतील. अर्जदारांना दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा आणि प्रवेशास पात्र होण्यासाठी कोणत्याही अभियांत्रिकीची पदवी असली पाहिजे.

या कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी गोवा शिपयार्ड लिमिटेड-वास्को, मुरगांव पोर्ट ट्रस्ट-, झुआरी इंडस्ट्रीज लि.-सांखवाळ, डेक्कन फाइन केमिकल्स-खोर्लिम, सीमेन्स-वेर्णा, मॅकब्राउटइंग. प्रा. लि.-मडगांव, एमआरएफ लि.- उसगाव, कॉमस्कोप-वेर्णा, सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स लिमिटेड-बेतोडा आणि लुंडाईम लिफ्ट कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड- खांडेपार, गोदरेज अँड बॉयस एमएफजी कंपनी लेड-मडकई, पेंटेअर वॉटर इंडिया प्रा. लि. – वेर्णा अशा गोव्यातील विविध उद्योगांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.

 पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आयआयडीसी, आयआयटी, एनआयटी, केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांसारख्या केंद्रीय अनुदानीत संस्थांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी पात्र आहे. इच्छुक अर्जदारांनी प्रत्यक्ष प्रवेश फेरीसाठी २० ऑक्टोबर २०२१ रोजी सर्व कागदपत्रांसोबत उपस्थित रहावे अर्ज आणि माहिती पुस्तिका http://me.gec.ac.in या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी  यांत्रिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ.सूरज राणे यांच्याशी ९८९०२०२३९० वर संपर्क साधावा  किंवा ssr@gec.ac.in वर भेट द्यावी.

Continue Reading