Connect with us

गोवा खबर

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये विश्वजित राणे

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीत गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
राष्ट्रीय कार्यकारी समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह एकूण ८० सदस्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे.
याचबरोबर या समितीमध्ये ५० जणांचा विशेष निमंत्रित आणि १७९ जणांचा स्थायी सदस्य  म्हणून समावेश करण्यात आला आहे. यात राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, नेते, नगरसेवक, माजी मुख्यमंत्री, माजी उप मुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे प्रभारी, उप प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, राज्य सचिव आणि संघटक यांचा समावेश आहे.
दरम्यान, विश्वजित राणे यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारी समितीत झाल्याने त्यांचे कार्यक्षेत्र राष्ट्रीय पातळीवर जाणार आहे. आरोग्यमंत्री या नात्याने विश्वजित राणे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत.

Continue Reading