Connect with us

गोवा खबर

नावेलीमध्ये बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्राचे कुतिन्हो यांनी केले उद्घाटन

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • गोमंतकियांना स्वावलंबी बनविण्यासाठी आम आदमी पक्ष कार्यतत्पर 
गोवा खबर : अॅड प्रतिमा कुतिन्हो यांनी आज रुंदमोल हाऊसिंग बोर्ड नवेली येथे महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी  DCW च्या माजी प्रमुख अंजली राय आणि आप महिला अध्यक्ष पॅट्रिसिया फर्नांडिस यांची उपस्थिती होती . स्त्रियांना स्वावलंबी होण्यासाठी या प्रशिक्षण केंद्रात विविध उपक्रम राबवले जाणार आहे .आप गोव्यात नोकऱ्या आणि रोजगारासाठी एक मोठी मोहीम  सुरू करणार आहे यासाठी  केजरीवाल यांच्या नोकरीच्या हमी विषयी स्थानिक पातळीवर काम सुरु आहे.
या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या अनेक महिला अशा कुटुंबांमधून येतात जिथे अनेकांनी महामारीमुळे कुटुंबातील एका व्यक्तीची नोकरी गेली आहे. अश्या परिस्थिती बेरोजगारी वाढत आहे तर दुसरीकडे रोजगार दिसत नाहीत. त्यामुळे या केंद्राचा प्रयत्न स्त्रियांना स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला या गरजेच्या वेळी मदत करण्याचा आहे.
केपेमधे महिलांसाठी हा उपक्रम यापूर्वीच सुरु करण्यात आला आहे तर बाणावली मध्ये 100 हून अधिक तरुणांनी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घेतला.
दिल्लीत त्यांचे सरकार अनेक महिला आणि युवकांना त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते या पार्श्वभूमीवर नावेलीच्या महिलांनाही  स्वावलंबी करणे हे आमचे दृष्टी आहे अस आप गोवा उपाध्यक्ष अॅड प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

Continue Reading