Connect with us

गोवा खबर

टोळीयुद्धे, वारंवार गुन्हे राज्याची प्रतिमा नष्ट करतात : विजय सरदेसाई

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : भाजप सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर घणाघाती टिका करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात भाजप सरकारच्या अपयशाने कुख्यात गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे आणि ते गुन्हे करत रस्त्यावर मोकळे फिरत आहेत.

वारंवार टोळीयुद्धे आणि वाढत्या गुन्हेगारीने गोव्याची प्रतिमा नष्ट केली आहे आणि सामान्य गोमंतिकांचे जीवन भयभीत आणि असुरक्षित बनवले आहे.

“मुख्यमंत्री प्रमोद सावंत जर गोव्यातील लोकांना सुरक्षा देऊ शकत नसेल, तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. सावंत गृहमंत्री पदावर असताना राज्यात कित्येक गंभीर गुन्हे घडलेले आहे आणि गुन्हे वाढतच आहेत. त्यांची असमर्थता लोकांचे जीव घेत आहे. ” असा आरोप फातोर्डाचे आमदार सरदेसाई यांनी केला.

भाजपने राज्याची प्रतिमा डागाळल्याचा आरोप त्यांनी केला. “गोवा एक महान, गौरवशाली आणि सुवर्ण राज्य म्हणून ओळखले जाते. एक समृद्ध संस्कृती, वारसा आणि आदरातिथ्य करणारे लोक इथे आहेत.  गुन्हेगारीविरुद्ध लढण्याचा आणि न्यायासाठी उभे राहण्याचा आमचा इतिहास आहे. परंतु या भाजप सरकारने ते चुकीच्या धोरणांमुळे नष्ट केले आहे. ” असे सरदेसाई म्हणाले.

“भाजप सरकाराच्या काळात राज्यात आता टोळ्या, बंदुका आणि गुंड दिसत आहेत. राज्यातील कुटुंबांना सुरक्षा हवी आहे जी हे सरकार पुरवण्यात अपयशी ठरले आहे. ” असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणले.

सरदेसाई यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा राज्य विधानसभेत मांडला होता, परंतु सरकारकडून कोणताही तीव्र प्रतिसाद मिळाला नाही. गृहमंत्री म्हणून सावंत यांची अकार्यक्षमता सध्या टोळ्या आणि सर्व प्रकारच्या गु्न्ह्यतून दिसत आहे.

“बलात्कार आणि दरोडे हे आधीच दैनंदिन झाले आहे, आता त्यात टोळीयुद्ध जोडले गेले आहेत. सरकारच्या सुस्तीचा आणि प्रशासनाची मूलभूत घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यात अपुरेपणाचा हा थेट परिणाम आहे. ” असे सरदेसाई म्हणाले.

“गोमंतकियांना माहित आहे की हे भाजप सरकार नोटीस कालावधीत आहे, पण जनतेने एक मिनिट सुद्धा त्रास का सहन करावा?” असा प्रश्न सरदेसाई यांनी केला.

Continue Reading