Connect with us

गोवा खबर

केजरीवाल सरकारचे वायू प्रदुषणाविरुद्ध युद्ध

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • प्रदूषणाच्या रिअल-टाइम स्रोतांविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी यंत्रणा 
  • केजरीवाल सरकार आणि आयआयटी कानपूर यांच्यात करार
गोवा खबर : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयआयटी कानपूर आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (डीपीसीसी) यांच्यात सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली आहे. केजरीवाल सरकार आणि आयआयटी कानपूर यांच्यात तंत्रज्ञानाबाबत करार झाला आहे. यामुळे वायू प्रदूषणाच्या रिअल-टाइम स्रोताची अचूक माहिती आता दिल्लीमध्ये उपलब्ध होईल. वायू प्रदूषणाचे स्त्रोत रिअल टाइममध्ये ट्रॅक केले जातील तसच दिल्लीतील वायू प्रदूषण व्यवस्थापनासाठी एक अंदाज जारी केला जाईल. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या प्रदूषणाचे विविध घटक ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात हे महत्वाचे पाउल ठरणार आहे.
“दिल्लीमध्ये अॅडव्हान्स एअर पोल्युशन मॅनेजमेंटसाठी रिअल-टाइम सोर्स अॅपॉर्पमेंट (real-time source apportionment of pollution )आणि फोरकास्टिंग” या शीर्षकाचा एक विस्तृत प्रस्ताव आयआयटी-कानपूरचे प्रोफेसर मुकेश शर्मा यांनी सादर केला आहे. आयआयटी-कानपूर, आयआयटी-दिल्ली, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टीईआरआय) आणि आयआयएसईआर मोहाली यांचे एक संघ देशाच्या राजधानीत हा अभ्यास करणार आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (पर्यावरण विभाग GNCTD च्या बाबतीत) यात नोडल एजन्सी म्हणून काम करणार.
प्रदूषणाचे रिअल-टाइम स्त्रोत विभाजन करण्याचे तंत्रज्ञान देशातील इतर कोणत्याही शहरात लागू केले गेले नाही. हवेच्या गुणवत्तेचे साप्ताहिक, मासिक आणि हंगामी स्पष्टीकरण, PAHs, आण्विक मार्कर आणि दुय्यम सेंद्रिय आणि अजैविक एरोसोलच्या अतिरिक्त ज्ञानासह होईल. तसेच, PM10 स्त्रोत विभाजनाचा PM2.5 च्या हिवाळी विश्लेषण आणि स्त्रोत विभाजनानंतर विचार केला जाईल, ज्याचे वेगळे आर्थिक परिणाम असतील. NOx, SO2, ओझोन, BTX, मूलभूत कार्बन, सेंद्रिय कार्बन आणि इतर सेंद्रिय संयुगे देखरेख करण्यास सक्षम होईल. दिल्लीच्या आत आणि बाहेर अनेक ठिकाणी हवा गुणवत्ता आणि हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) चे अंदाज करणे जेथे शक्य असेल तेथे नियंत्रित केले जाईल.
आजच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, शास्त्रज्ञ या नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात करतील. हे शास्त्रज्ञ दिल्ली प्रदूषणास कारणीभूत ठरणारे विविध घटक ओळखणार आणि त्यांचे निराकरण करणार .डीपीसीसीला मागणीनुसार निधी जारी करण्यासाठी “प्रदूषण नियंत्रण आणि आपल्काल व्यवस्थापन” च्या नियोजन योजनेअंतर्गत “जुळणी बचत” म्हणून दिला जाईल. GNCTD या साठी 12.727 कोटी.  निधी जारी केला जाईल.
“रिअल-टाइम स्त्रोत विभाजन” प्रकल्प दिल्लीतील कोणत्याही ठिकाणी वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत घटक ओळखण्यास मदत करेल. विविध प्रदूषण स्त्रोतांवरील वाहने, धूळ, बायोमास जळणे,  आणि उद्योगांमधून होणारे उत्सर्जन याचा रिअल-टाइम प्रभाव समजून घेण्यास मदत होईल. प्राप्त झालेल्या निकालांच्या आधारे, दिल्ली सरकार प्रदूषणाच्या स्त्रोतांना आळा घालण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यास सक्षम असेल. प्रकल्पाची सुरळीत अंमलबजावणी, उद्दिष्टे साध्य करणे आणि प्रकल्पाचे कार्यक्षम देखरेख सुनिश्चित करणार आहे. दिल्लीच्या प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची ओळख करून या घटकांना दूर करण्यासाठी हे महत्वाचे पाउल ठरणार आहे.

Continue Reading