Connect with us

गोवा खबर

भाजपा सरकारच्या अपयशावर शिवसेनेने वेधले राज्यपालांचे लक्ष

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : राज्यात कायदा आणि सुव्यस्था बिघडली असून सरकार सर्वच पातळ्यावर अपयशी ठरले, आहे असे शिवसेनेने आज राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस, बार्देश तालुका प्रमुख विसेंन्ट पेरेरा, उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर, सत्तरी तालुका प्रमुख गुरूदास गावकर आणि म्हापसा मतदारसंघ सचिव शाहिस्ता खान उपस्थित होते.
शांती प्रिय गोवा आज बदललेला असून कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असल्याचे कामत यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्यपालांनी सांगितले की बाकि राजकीय पक्षांनीही कायदा सुव्यवस्थेचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारकडे चौकशी केली असता तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती देण्यात असल्याचे  राज्यपालांनी सांगितले आणि शिष्टमंडळाकडे अधिक विस्तृत चर्चा केली.
बाणावली बलात्कार आणि इतर प्रकरणी सखोल माहिती दिल्यानंतर राज्यपालांनी सदर घटना दुदैवी असून शिवसेनेच्यावतीने लेखी निवेदन देण्याचे आवाहन केले आहे. भुमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्यपालांनी सरकारला मार्गदर्शन करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
राज्यपालांनी स्वतः लिहिलेली पुस्तके भेट दिली आहेत. तर गोव्यातील पर्यावरणवादी राजेंद्र केरकर लिखीत natural heritage of Goa हे पुस्तक शिवसेनेतर्फे राज्यपालांना भेट देण्यात आले.

Continue Reading