Connect with us

गोवा खबर

आंतरराष्ट्रीय फॅशन वीक २०२१ उत्साहात

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • राज्यासह देशभरातील फॅशन उद्योजकांचा सहभाग
गोवा खबर : वाईल्ड ऑर्किड एन्टरटेन्मेंट आणि मांडवी एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दोनापावलं येथील हॉटेल सिदादी गोवा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फॅशन वीक २०२१ ला प्रचंड प्रतिसाद लाभला.
हा कार्यक्रम १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान पार पडला. आयएफडब्ल्यू संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम झेवियर, संचालक जनार्दन भंडारी, सेलिब्रिटी अँकर आणि व्यवस्थापकीय संचालक गोवा येलो पेजेस पीआर मीडियाचे डेस्मंड ऑलिवेरा, आय एफ डब्लु चे असोसिएट आशुतोष खांडेकर, राहिला खान,  ओल्गा हुसैन, आशा आरोंदेकर, न्यूटन डायन, आदींच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि जोषपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमासाठी गोवा पर्यटन खाते, मॉल दी गोवा, कॅसिनो प्राइड, विमल डेव्हलपर्स, कासा टिटो, वॉटरमार्क फ्लोटिंग लाउंज, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हे प्रायोजक होते.
तीन दिवस चाललेल्या या फॅशन वीकमध्ये  गोमंतकीयासंह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील डिझायनर सहभागी झाले होते. तसेच सुमारे 150 पेक्षा अधिक  मॉडेल्सनी विविध ब्रँडचे प्रमोशन आणि लॉन्चिंग केले. या दरम्यान फॅशन स्पर्धाही झाली  तसेच खरेदीदार, उत्पादक आणि डिझायनर्सची बैठक झाली. याच बरोबर नेटवर्किंग सत्र, फॅशन बझार (प्रदर्शन आणि पॉप अप स्टॉल्स), विक्री, कार्यशाळा, फॅशन, चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून बेटी बचाओ – बेटी पढाओ आदी कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
आयएडब्ल्यूमध्ये मुंबईतील ड्रीम मेकर्स, पुण्यातील अल्लाज एंटरटेनमेंट, बंगळुरुमधील शनोज इराणी फॅशन, कोचीचे कॅटवॉकर्स, भुवनेश्वरमधील ला लोटस फॅशन, दिल्लीहून नृत्य फॅशन आणि रांचीहून स्किल प्रो इंडिया आदी सहभागी झाले होते.
3 दिवसांच्या फॅशन बझारमध्ये जगभरातील विविध डिझायनर्सचे पोशाख दाखवले गेले.
दरम्यान, या कार्यक्रमातून मिळालेल्या पैशातून बेटी बचाव बेटी पढाव या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुलींचे शिक्षण, आणि त्यांना फॅशन वर्ल्ड विषयी माहिती व्हावी यासाठी खर्च करतो. तसेच फॅशन उद्योगात नव्याने येणाऱ्या युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी या पैशांचा विनियोग केला जातो.

Continue Reading