Connect with us

गोवा खबर

विश्‍वजित राणे रडण्याची नौटंकी बंद करा: मनोज परब

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येताच आमदार स्वतःच्या मतदारसंघात लोकांना भेट देतात. अशाच एका प्रसंगात वेळी वाळपईचे मंत्री विश्वजीत राणे यांनी परये गावाला भेट दिली होती. यावेळी व्यासपीठावर बोलताना त्यांनी डोळ्यातून अश्रू काढले मात्र व्यासपीठावरील त्यांच्या डाव्या बाजूला बसलेली एक व्यक्ती हसत होती. त्यामुळे विश्वजित राणे खरेखुरे रडतात की फक्त रडण्याचे ढोंग करत आहेत हे काही समजेना.
यालाच निशाणी साधून रिव्होल्युशनरी गोवन्स चे प्रमुख मनोज परब यांनी सामाज माध्यमाद्वारे विश्वजीत राणे वर हल्लाबोल केले आहे. मिळवली मध्ये आयआयटी प्रकल्प येणारच असे म्हणणारे विश्वजीत राणे मिळवलीचे आंदोलक रडत होते तेव्हा मात्र यांच्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते. आणि मतदान तोंडावर पोचताच रडण्याचे धूम करत आहे असे परब यांनी म्हटले.
वाळपई मतदार संघात सुरळीत पाणी, विज, रस्ते,  जमीन मालकी हक्क, नेटवर्क, यासारख्या कितीक समस्या जनतेला सतावत आहेत. हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांना विश्वजीत राणे कडून मिळाले होते. मात्र यावर अजून तोडगा निघाला नाही. राणे घराणेशाही गेली पन्नास वर्ष राजकारणात आहेत पण ज्या मतदारांनी त्यांना राजकारणात पोहोचवले त्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. वाळपई मतदार संघात विश्वजीत राणे नावाच्या अंगणवाडी चालू केल्याच्या पाट्या दिसून येतात पण अंगणवाडी मात्र गायब. अंगणवाडी शिक्षक, शिक्षिकांना करोनाच्या काळात कोणताही जीवित सुरक्षा न देता मतदार संघात काम करायला लावले.
 वादळात जमीनदोस्त झालेली घरे बांधून देण्याचे आश्वासन विश्वजीत राणे यांनी जनतेला दिले होते मात्र अजूनही ते बेघर आहे. गणेश चतुर्थी वेळ कापेतीच्या आसरा खाली गणपती पूजा करण्याची वेळ त्यांच्यावर आली. सरकारने दिलेली मदत पुन्हा घर उभे करण्यासाठी पुरेशी नाही. राणे फक्त चतुर्थी वेळी पोटलांचे वाटप करून निघून गेले.
2017 च्या निवडणुकीवेळी विश्‍वजित राणे यांनी बाराशे बोगस नियुक्ती पत्र वाटप केली होती मात्र प्रत्यक्षात नोकरी अजूनही कुणाला मिळालेली नाही. होंडा औद्योगिक वसाहत मध्ये वाळपई मतदार संघातील युवकांना नोकऱ्या मिळवून द्यायला ते अपयशी ठरले आहेत.
विश्वजीत राणेंनी वाळपई मतदार संघात जवळपास 9000 बोगस परप्रांतीय मतदान पत्रे करून ठेवली आहेत. हे सर्व त्याचे मतदार आहेत व सत्तरीच्या जनतेेला मिळणाऱ्या सुविधांचे निम्मे वाटेकरी आज हे परप्रांतीय बनले आहेत यावर विश्वजित राणे कोणतीही कारवाई करत नाही असे परब यांनी पुढे बोलताना म्हटले.

Continue Reading