Connect with us

गोवा खबर

पुढारलेल्या गोव्यात अजूनही अनेक गाव रस्ते आणि  पाण्यापासून वंचित;हिच का ती डॉ.प्रमोद सावंत यांची स्वयंपूर्णा गोवा मोहीम ?:आप

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 गोवा खबर:गोवा मुक्ती नंतरही राज्यातील अनेक गावे रस्ता आणि पाण्यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत . सरकारच्या निष्क्रीयतेबद्दल आम आदमी पक्षाने आज सावंत सरकारला फटकारले. एकीकडे डॉ.प्रमोद सावंत “सरकार तुमच्या दारी ” हि जनसंपर्क मोहीम चालवत आहे तर दुसरीकडे सरकारचा अश्या गावांकडे संपूर्ण संपर्क तुटलेला आहे.
  • केपे येथील कावरे पिर्ला पंचायत क्षेत्रातील उबो फातर गाव आजही वीज आणि पाण्यापासून वंचित गाव आहे . या गावात दळणवळणाचीही साधने उपलब्द नाहीत जवळच्या बस स्टॉपवर जाण्यासाठी तासतास चालत जावे लागते. यामुळे अनेकांना नोकरीही नाही . या गावाला आधुनिक जगाचा भाग होण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्द केलेला नाही. नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळे इतर गावांना त्रास होत असताना उबो फातर गावात अनेकांकडे मोबाईल  उपकरणे देखील नाहीत.
प्रमोद सावंत हर घर नल आणि त्याच्या बनावट मोफत पाणी योजनेचा मोठा गाजावाजा करतात  मात्र  उबो फातरमध्ये रहिवाशांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर चालत जावे लागते.
“गोवेकर प्रमोद सावंत यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळले आहेत. ते अगदी मूलभूत सुविधा पुरवण्यास असमर्थ आहे” असे आपचे गोवा सहसचिव राऊल पेरिएरा म्हणाले.
“सावंत सरकारचे जुमले रोज कसे उघड होत आहेत हे गोवेकर पहात आहेत. हे धक्कादायक आहे की 21 व्या शतकात आमच्याकडे गोव्यात वीज आणि पाणी नसलेली गावे आहेत. प्रमोद सावंत ह्यांना अश्याच परीस्थित हर घर जल म्हणायचे आहे का?” अशी टिका आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

Continue Reading