Connect with us

गोवा खबर

गोव्यातील प्रत्येक बूथवर केजरीवाल यांची रोजगार हमी पोहचविण्यासाठी आप सज्ज

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोव्याचे संयोजक राहुल म्हांब्रे यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन
गोवा खबर:आम आदमी पार्टी गोव्यातील प्रत्येक बूथवर केजरीवाल यांची रोजगार हमी पोहचविण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नोकरीच्या हमीच्या तपशीलांवर आप नेत्यांना मार्गदर्शन केले . प्रत्येक गोमंतकीयांना या मोहिमेत कसे सहभागी करावे आणि याची माहिती जनतेपर्यत कशी पोहचवावी याची माहिती देण्यात या वेळी देण्यात आली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात सरकारी नोकऱ्यांमढे पारदर्शकता आणून सर्वसामान्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील अस वचन दिल आहे . त्याच प्रमाणे आम आदमी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक युवकाला रोजगार आणि  रोजगार उपलब्ध तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाला दरमहा 3,000 रुपये बेकारी भत्ता दिला जाईल अस आश्वासन दिले आहे . याशिवाय खाजगी क्षेत्रातील 80 टक्के नोकऱ्या गोव्यातील तरुणांसाठी राखीव असतील. पर्यटन आणि खाणकाम बंद झाल्यामुळे रोजगार गमावलेल्या कुटुंबांना दरमहा 5,000 रुपये दिले जातील अशी घोषणाही करण्यात आली आहे . तसच कौशल्य विकासासाठी आप सरकार दिल्लीच्या डीएसईयूच्या धर्तीवर गोव्यात एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करेल.
गोव्यातील तरुणांना बर्याच काळापासून नोकऱ्यांच्या अभावामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि याचे एक मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार हि परिस्थितीत  बदलण्याची एकमेव आशा म्हणून तरुण आता आपकडे पाहत आहेत.  लॉकडाऊन दरम्यान उदरनिर्वाह गमावलेल्यांना अरविंद केजरीवाल यांनी कशा प्रकारे मदत केली , रोजगार पोर्टलने अनेकांना नोकऱ्या कशा दिल्या आणि शिक्षणात कौशल्य विकास कसे एकीकृत केल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे हे आप नेते गोवेकरांना समजावून सांगतील.
“आम आदमी पार्टीला गोव्यातून खूप प्रेम मिळाले आहे. गोवेकरांना खरोखरच कौतुक वाटत आहे कि अरविंद केजरीवाल यांनी  दिल्लीत या सर्व गोष्टी कशा शक्य केल्या आहेत!मला विश्वास आहे की आमचे नेते हा संदेश तळागाळापर्यंत नेतील!” अस राहुल म्हांब्रे म्हणाले

Continue Reading