Connect with us

गोवा खबर

कोविड रुग्णांच्या कुटुंबीयांना  नुकसान भरपाई कधी देणार ते स्पष्ट करा : तुलीयो डिसोजा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : गोव्यातील कोविड रुग्णांच्या मृत्युंसाठी पुर्णपणे जबाबदार असलेले भाजप सरकार आज निर्लज्जपणे केवळ दोन लाखांचे सानुग्रह  अनुदान मृतांच्या कुटुंबियांकडे देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करुन प्रसिद्धी मिळवीण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्यात डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोविड रुग्णांची हत्याच केली आहे असा गंभीर आरोप कॉंग्रेस प्रवक्ते तुलीयो डिसोजा यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनाने कोविडचे मृत्यु  झालेल्या कुटुंबीयांसाठी नुकसान भरपाई कधी देणार यावर स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी तुलीयो डिसोजा यांनी केली आहे.
कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष बाबी बागकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सचिव अर्चित नाईक, साईश आरोसकर, दत्ताराम पेडणेकर व नगरसेवक ज्योएल आंद्राद हजर होते.
गोव्यात आजपर्यत ३२९९ जणांचा कोविडने मृत्यु झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सुमारे ४०० रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यु झाले. सरकारने मृत्युची नोंदणी करण्यातही घोळ घातल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सरकार आज कोविडची केवळ दोन लाखांची सानुग्रह रक्कम देतानाचे फोटो काढुन प्रसिद्धी घेते. मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना दाखवण्याचे भान सरकारला राहिलेले नाही. “आपदा मे अवसर” चे धोरण राबविणारे भाजप सरकार लोकांच्या दु:खाचा ही बाजार मांडत आहे हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल जनतेची माफी मागावी अशी मागणी तुलीयो डिसोजा यांनी केली आहे.
आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करुन सरकार स्थापन केल्यानंतर कॉंग्रेस सरकार कोविड रुग्णांच्या जवळच्या नातेवाईकासाठी व खास करुन ज्या मुलांचे दोन्ही पालक कोविडात दगावले यांच्यासाठी नोकरी उपलब्ध करुन देणार आहे अशी घोषणा तुलीयो डिसोजा यांनी केली.
भाजपने गोव्यात “आजाराचा बाजार” केला. टीका उत्सवाला राजकीय रंग देत भाजप कार्यकर्त्यांनी आपली प्रसिद्धी करुन घेतली. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची भाजप मंत्री-आमदारांनी साठवणुक केली. आयव्हरमेक्टीन गोळ्यांचा वापर करण्याचे सांगुन २२.५० कोटींचा घोटाळा केला असे तुलीयो डिसोजा म्हणाले .
कॉंग्रेस पक्ष आता तळागाळात मजबुत होत आहे  व त्यामुळेच काही उपद्रवी अपशकुन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण युवा व निष्टावान कार्यकर्ते अशा उपद्रवीयांच्या कारवाया कदापी यशस्वी होवू देणार नाहीत असे बाबी बागकर म्हणाले.
आमदार लुईझीनो फालेरो यांचा पक्षात मान राखला जात नाही का?  या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तुलीयो डिसोजा यांनी लुईझीनो फालेरो यांनी पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच अखिल भारतीय समितीचे महासचिव म्हणुन कार्यभार सांभाळल्याचे सांगीतले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने त्यांची महत्वाच्या निवडणुक संयोजन समितीवर नेमणुक केल्याचे तुलीयो डिसोजा यांनी स्पष्ट केले. स्वता लुईझीनो फालेरो यांनीच आपली कॉंग्रेस पक्षात मानहानी न झाल्याचे प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील असे तुलीयो डिसोजा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Continue Reading