Connect with us

गोवा खबर

सावंत यांनी 10000 नोकऱ्यांचे दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? आप 

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : ३० नोव्हेंबर पर्यत राज्य सरकार १०,००० बेरोजगारांना नोकरी देणार असल्याचे नुकतेच आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते या नोकऱ्या ३०नोव्हेंबरपर्यंत सावंत सरकार कशा देतील याचे स्पष्टीकरण आम आदमी पक्षाने मागितले आहे .सप्टेंबर महिना संपत आला मात्र अद्याप या नोकरी संदर्भात कोणत्याही जाहिराती केल्या गेल्या नाहीत,याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नोकरी संदर्भात सावंत यांची घोषणा पुन्हा एकदा जुमला ठरले अशी टिका आम आदमी पक्षाने केली .सावंत यांनी या वर्षाच्या अखेरीस 10,000 नव्हे तर किमान  1,000 नोकऱ्या देण्याचे आव्हान यापूर्वीच आम आदमी पक्षाने सावंत यांना दिले होते या नोकऱ्या सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून देण्यात याव्या अशी अट देखील घालण्यात आली आहे
झेडपी निवडणुकीपासून प्रमोद सावंत गोवेकरांना 10,000 नोकऱ्यांचे आश्वासन देत आहेत. पण या 10,000 नोकऱ्या कुठे आहेत. या संदर्भात एकही जाहिरात पाहिली नाही आणि सावंत या नोकऱ्या कशा देतील असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला .
 कोविड महामारी दरम्यान आपला जीव धोक्यात घालणाऱ्या 400 आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील 5 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच वृत्त या दरम्यान येवून धडकले त्या मुळे जे सरकार 400 कोविड  योद्ध्यांना पैसे देऊ शकत नाही ते गोव्यात 10,000 नवीन नोकऱ्या कश्या निर्माण करणार ?
“राणे आणि सावंत यांनी नोकऱ्या देण्याबाबत खोटे बोलणे थांबवावे. तसच वर्षाच्या अखेरीस 10,000 नव्हे तर केवळ 1,000 नोकऱ्या निवडीची औपचारिकता पूर्ण करून द्याव्या असे आप चे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.

Continue Reading