Connect with us

गोवा खबर

भाजपने गोव्याच्या कोविड योद्धांचा केला विश्वासघात

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : राज्यातील भाजप सरकारने कोविड योद्धांचा   विश्वासघात केला आहे अस सांगून आम आदमी पक्षाने राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला  . गोमेकॉ मधील 400 मल्टीटास्क कर्मचाऱ्यांना मागील ५ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

गोवेकरांना 10,000 नोकऱ्यांचे आश्वासन देणारा भाजप 400 कर्मचाऱ्यांना त्यांची देणीही देऊ शकत नाही का ? असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला  महामारीच्या काळात 400 गोमंतकीयांना  शासनाने मल्टीटास्किंग कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे लोक पुढे आले होते आणि त्यांनी गोव्याला कोविडच्या तावडीतून मुक्त करण्याचे मोलाचे योगदान दिले त्याचा प्रती सरकारची हि अनास्था निषेधार्य असल्याचे आम आदमी पक्षाच्या वतीने अस्वस्थ करणारे आहे.
कोविड पॉझिटिव्हिटी रेटसह गोवा हे जगातील सर्वात जास्त प्रभावित ठिकाणांपैकी एक असताना आज दुसऱ्या लाटेनंतर आघाडीच्या योद्ध्यांना सावंत सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत . भाजप कडून अनेकदा अश्या योद्ध्यांचा सन्मान करून एक दिखावा केला जातो अशी टिका आपने केली.
अलीकडेच गोव्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, परंतु या कामगारांना त्यांच्या हृदयाच्या जवळचा सण साजरा करण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागले. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार किती कठोर बनले असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल अशी टीका करण्यात आली दाखवतील.या प्रकरणी आप चे नेते डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी सरकाच्या धोरणाचा निषेध केला.
“गोव्याच्या कोविड योद्ध्यांना चतुर्थीच्या उत्सवासाठी पैसे उधार घ्यावे लागतात हे पाहून खूप धक्का बसतो. डॉ. प्रमोद सावंत यांनी थकीत वेतेन त्वरित द्यावे अशी मागणी आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांब्रे यांनी केली.

Continue Reading