Connect with us

गोवा खबर

काणकोणमध्ये आम आदमी पक्षाला बळकटी

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • मोठ्या संख्येने स्थानिक युवक पक्षात सामील
  • मनोहर पर्रीकर बायपासच्या दयनीय अवस्थेचा केला निषेध 
गोवा खबर : आपच्या युवा धोरणांनी प्रभावित होऊन काणकोणमधील 40 हून अधिक स्थानिक युवकांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला काणकोण पाळोळे येथे आयोजित कार्यक्रमात आपचे नेते आणि पंच सदस्य अनुप कुडतरकर, डॉ.विभास प्रभुदेसाई, सरचिटणीस आणि युवा शाखा प्रभारी हँझेल फर्नांडिस दक्षिण गोवा युवा अध्यक्ष जोहान वेर्णेकर आणि उपाध्यक्ष वैभव फळदेसाई उपस्थितीत होते
नुकतेच अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या युवकांना नोकरीची  हमी देण्याच्या घोषणेमुळे युवकांच्या या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत  भाजप आणि काँग्रेसने गोव्यातील तरुणांना केवळ खोटी आश्वासने देऊन फसवले आहे त्यामुळे आज भारतातील तरुणांना आप एक आशेचा किरण वाटत आहे.
पक्ष प्रवेशा दरम्यान काणकोणमधील खड्डेमय रस्ते आणि  मनोहर पर्रीकर बायपासच्या दयनीय अवस्थेचा प्रतिकात्मक निषेधही करण्यात आला . या युवकांनी खड्ड्यांभोवती मेणबत्त्या पेटवून वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला . आप’चे नेते अनुप कुडतरकर यांनी बायपासवरील  खराब झालेल्या पथदिव्यांकडे लक्ष वेधले.
“गोव्यातील तरूण हे राज्याचे शक्तीस्थान आहेत आणि तरुणांची उन्नती म्हणजे राज्याचे आणि राष्ट्राचे कल्याण आहे. आज गोव्यातील तरुणांना समजले आहे की भाजप आणि काँग्रेसने त्यांना स्वार्थासाठी वापरले . त्यांच्याकडे चांगले रस्ते नाहीत, चांगले नाहीत. शाळा, चांगली आरोग्यसेवा नाही आणि नोकऱ्याही नाहीत, असे अनुप कुडतरकर म्हणाले.
“गोव्यातील युवक प्रतिभावान आहेत, परंतु आमची स्वप्ने साध्य करण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळत नाही . आज अरविंद केजरीवाल यांनी केवळ तरुणांसाठीच नव्हे तर संपूर्ण गोव्यासाठी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आहे अस हॅन्झेल फर्नांडिस म्हणाले.
“भाजप आणि काँग्रेसने नेहमीच तरुणांना राजकीय प्रचाराचे हत्यार म्हणून वापरले आहे .निवडणुकीनंतर सरकाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे.” डॉ. विभास प्रभुदेसाई म्हणाले.

Continue Reading