Connect with us

गोवा खबर

आपच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या उपाध्यक्षपदी सेसिल रॉड्रिक्स

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • अरविंद केजरीवाल यांनी केली नियुक्ती
गोवा खबर : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत  सेसिल रॉड्रिक्स यांची आपच्या राष्ट्रीय युवा शाखेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रॉड्रिग्स 4 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ताळगाव येथून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. गोव्यातील रस्त्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी ‘रोस्तो गोवा’मुळे त्या प्रसिद्ध आहेत.
लॉकडाऊन दरम्यान गरजूंसाठी मोफत वाहतुकीसह अन्न, पाणी, औषधे आणि आपत्कालीन मदतीची गरज असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रॉड्रिग्स यांनी आपल्या टीम सोबत स्वेच्छेने काम केले.
दुसऱ्या लाटेदरम्यान जीएमसीमध्ये रूग्णांना आणि कुटुंबांना मदत मिळवण्यात रॉड्रिग्सचा मोलाचा वाटा होता तसच जीएमसी मधील वास्तव उघड केले याच दरम्यान कोविड मुळे तिच्या वडिलांना मरण आले.
नुकतेच सेसिल हिने लक्झरी बसेस आरटीपीसीआर चाचण्यांशिवाय प्रवाशांकडून  लाच कशी गोळा करते हे उघड केल होत.
“मला आप युथ विंगच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आणि संधी दिल्याबद्दल मी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानू इच्छितो. फक्त आपच गोवा आणि संपूर्ण भारतातील तरुणांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यास आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करू सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या.

Continue Reading