Connect with us

गोवा खबर

आर्च बिशप फेर्रांव यांची राज्यपालांशी भेट

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : गोव्याचे आर्च बिशप फिलिप नेरी फेराव यांनी आज राजभवनात गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली.

डायलिसिस करत असलेल्या व्यक्तींना आणि वृद्धाश्रम, अनाथालये आणि निराधार संस्थांना मदतीचा हात देत असल्याबद्दल बिशप यांनी राज्यपालांचे अभिनंदन केले.

राज्यपालांनी अलीकडेच डायलिसिस रुग्ण आणि कल्याणकारी संस्थांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. बिशप यांनी समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याचा राज्यप्रमुखांकडून केलेला एक अनोखा प्रयत्न असल्याचे सांगितले..

आर्चबिशप फिलिप नेरी फेराव यांनी राज्यपालांचे आभार मानले आणि त्यांना गोव्याच्या लोकांसाठी आपले चांगले काम चालूच ठेवण्याचा आशीर्वाद दिला.

Continue Reading