Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांहस्ते कोविड रिलीफ लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरीत

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना तसेच उपेक्षित क्षेत्रातील लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मंजुरी पत्रे वितरित केली.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचे सरकार सामान्य माणसाचे असून सामान्य माणसाच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले. कोविड महामारीमुळे राज्यातील लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. अनेक कुटुंबांनी त्यांचे कुटुंबातील सदस्य गमावले आहेत तर दुसरीकडे पारंपारिक व्यवसायिकांना व्यवसायाच्या अभावामुळे त्रास सहन करावा लागला असे ते म्हणाले आणि सरकारने त्यांना मदत करण्याचा निर्णय सामान्य माणसांप्रती बांधिलकी म्हणून घेतला असल्याचे सांगितले.  सरकारने जनतेच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत. कोविड साथीच्या आजारामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती वाढली आहे. तथापि सरकारने परिस्थितीवर मात केली आणि सामान्य व्यक्तीकडे दुर्लक्ष केले नसल्याचे ते म्हणाले. ज्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यांना लवकरच मिळेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

समाज कल्याण मंत्री मिलिंद नाईक यानी यावेळी बोलतांना कोविडमुळे आपल्या अनेक गोमंतकीयाना नोकरी, व्यवसाय, कुटुंबाचा प्रमुख, कुटुंबातील इतर सदस्य असा त्रास सहन करावा लागला आहे सरकारने ज्यांनी आपल कमावता सदस्य गमावला आहे त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना आधार देण्यासाठी कोविड- १९ आर्थिक सहाय्य योजना तयार केली. या योजनेंतर्गत सुमारे ४७१ लोकांनी अर्ज केले आणि त्यापैकी ३४९ अर्ज मंजूर झाले ज्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थीला मदत म्हणून २ लाख रुपये मिळतील. कोविड शिष्टाचारामुळे या कार्यक्रमात केवळ ५० लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आले. इतर योजनेअंतर्गत अनेक अर्ज स्वीकारले त्यापैकी १०० लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीचे आदेश देण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना तालुकास्तरीय कार्यालये आणि ग्राम पंचायतींद्वारे त्यांचे मंजुरीचे आदेश मिळतील अशी माहिती त्यांनी दिली.

समाज कल्याण सचिव व्हीव्हीजे राजशेखर आयएएस यांनी पाहुण्याचे स्वागत केले. समाज कल्याण संचालक उमेशचंद्र जोशी, समाज कल्याण उपसंचालक ताहा हाजिक यावेळी उपस्थित होते. प्रदिप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कल्याण अधिकारी श्रीमती सुप्रिया मांद्रेकर यांनी आभार मानले.

Continue Reading