Connect with us

क्रीडा खबर

पर्रात 2 ऑक्टोबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
गोवा खबर : येत्या दोन ऑक्टोबरला पर्रा येथे बार्देश तालुका मर्यादित भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्राच्या सरपंच दिलायला लोबो  यांनी ही माहिती दिली. यावेळी कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, नागवा-हडफडेचे सरपंच राजेश मोरजकर, काणका- वेर्लाच्या सरपंच अमिता कोरगांवकर, शारीरिक शिक्षक नितीन लिंगुडकर, सावळ, दयानंद हरमलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हापसा जवळच्या पर्रा जंक्शनवर सकाळी सव्वासहा वाजता मंत्री मायकल लोबो यांच्याहस्ते ध्वज फडकावून या सायकल रॅलीची सुरुवात होणार आहे. ही रॅली पर्रा – टिटोपासून साळगाव जंक्शन तसेच कळंगुट डॉल्फिन सर्कल आणि तेथून नागवा सर्कल ते पुन्हा पर्रा – टिटो अशी असणार असल्याची माहिती यावेळी पर्राच्या सरपंच दिलायला लोबो यांनी दिली.
सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी चौदा वर्षावरील युवक-युवती तसेच ऐंशी वर्षापर्यतची शारीरिकद्रुष्ट्या तंदुरुस्त असलेली कुणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते, त्यासाठी नाव नोंदणी सुरु झालेली आहे. या सायकल रॅली दरम्यान, वाटेत जागोजागी रिफ्रेशमेंटची व्यवस्था तसेच प्राथमीक औषधोपचारासहित रुग्णवाहिका पुर्णवेळ उपलब्ध असणार आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी तसेच नाव नोंदणी करण्यासाठी 24 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आयोजकाकडून टी-शर्ट, टोपी तसेच शेवटी प्रशस्तीपत्र तसेच मेडल बहाल करण्यात येणार आहे.  ‘टुगेदर फॉर बार्देश’ या बॅनरखाली, या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी दिली, तसेच प्रत्येक जागरूक नागरिकानीं या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन मंत्री मायकल लोबो यांनी यावेळी केले.

Continue Reading