Connect with us

क्रीडा खबर

९६ सायकलस्वारांनी पूर्ण केली ऑडॅक्स शताब्दी २०० किमी बीआरएम राइड

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

१६ महिला सायकलस्वारांनी पूर्ण केली २०० किमी राईड

 गोवा खबर: रविवारी ९६ सायकलस्वारांनी ट्राय गोवा आयोजित ऑडॅक्स शताब्दी २०० किलोमीटर ब्रेवेट्स रॅन्डोन्यूर मॉंडियाक्स (बीआरएम) एंडयुरन्स सायकल राइड यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, यशस्वीरीत्या राईड पूर्ण करण्यामध्ये १६ महिला सायकलस्वारांचा समावेश आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात, ट्राय गोवाचे संस्थापक राजेश मल्होत्रा ​​म्हणाले की, गोवा, बेळगावी आणि बेंगळुरू येथील १०३ सायकलस्वारांनी प्रोबाईक, पणजी येथून सकाळी ६ वाजता राइड सुरू केली आणि धारबांदोडा -मोले -उगे -नेत्रावळी -केपे- लोटली मार्गे १३ तास ३० मिनिटांच्या निर्धारित वेळेत प्रोबाईक, पणजी येथे संपवली.

मल्होत्रा म्हणाले की, ९६ सायकलपटूंना फ्रान्समधील ऑडॅक्स क्लब पॅरिसियन (एसीपी) कडून विशेष शताब्दी पदके मिळतील. लांब पल्ल्याची सायकलिंग किंवा बीआरएम १९०४ मध्ये फ्रान्समध्ये उदयास आली आणि १९२१ पर्यंत ‘ऑडॅक्स’ हे पदनाम सुमारे ४,५०० फ्रेंच सायकलस्वारांना देण्यात आले. त्यांनी २०० किमी, ३०० किमी आणि ४०० किमी सायकल राइड पूर्ण केली. म्हणूनच, ऑडॅक्स शताब्दी वर्षानिमित्त २०० किमी बीआरएम या वर्षी जगभरात आयोजित केले जात आहे.

रविवारी ऑडॅक्स शताब्दी राईडला गोव्याचे सर्वात निपुण सहनशक्ती सायकलपटू वेणुवर्धन रेड्डी यांनी झेंडा दाखवला, ज्याने पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस, गोवा ते कन्याकुमारी आणि सहा, सुपर रॅन्डोनेर मालिका सायकल राईड एका कॅलेंडर वर्षात पूर्ण केल्या आहेत.

मल्होत्रांच्या मते हा मार्ग गोव्याच्या सुंदर अंतर्भागात हिरवळ आणि झाडांच्या सॅनिध्यातून निश्चित करण्यात आला होता. ते ​​म्हणाले, “आम्ही सर्व सहभागींच्या प्रयत्नांचे कौतुक करतो आणि ऑडॅक्स शताब्दी वर्षांच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो.”

ट्राय गोव्याने त्याच दिवशी १०० किमी, “अमिगोस सेंच्युरी राइड” चे आयोजन केले. तब्बल १९ सायकलस्वारांनी पणजी ते अमिगॉस हॉटेल, धारबांदोडा आणि परत पणजीला सायकल चालवून १०० किमीची राईड पूर्ण केली.  त्यांना ट्राय गोवा तर्फे विशेष पदक दिले जाईल.

 

मीडिया रीलिझमध्ये म्हटले आहे की १०० किमी आणि २०० किमी दोन्ही राइड असमर्थित होत्या आणि सहभागींना मार्गावर स्वयंपूर्ण असणे आवश्यक होते. मल्होत्रा ​​म्हणाले, “या राईड्स स्पर्धात्मक नसल्या तरी, सहभागींना पात्र होण्यासाठी विशिष्ट वेळेच्या मर्यादेत नियंत्रण बिंदू गाठणे आवश्यक होते.”

ट्राय गोवा शनिवारी, २ ऑक्टोबर, २०२१ रोजी ३०० किमी बीआरएम राइड आयोजित करणार आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने १५० किलोमीटर “शांतीसाठी पेडल” आणि क्लब प्रोबाईकच्या सहकार्याने ५ किमी आणि १० किमी धावण्याचेही आयोजन केले जाईल असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Continue Reading