Connect with us

गोवा खबर

आपच्या ३००० बूथ स्वयंसेवकांनी दिल्या अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  • आप कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन
गोवा खबर : अरविंद केजरीवाल आपली दुसरी हमी जाहीर करण्यासाठी गोव्यात आले असता,संपूर्ण राज्यातील आपच्या ३००० बूथ स्वयंसेवकांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या . तसच गोव्याच्या ११९  पंचायतींच्या  स्वयंसेवकांनी म्हपासा येथे केजरीवाल यांची भेट घेवून  आप गोव्यात निवडणून येईल यासाठी स्वयंसेवकांनी प्रतिज्ञा घेतली.अरविंद केजरीवाल यांच्या दुसऱ्या हमीमुळे स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढला आहे.
आम आदमी पार्टी आक्रमकपणे राज्यात काम करत असून घरोघरी पोहोचण्याचा कार्यक्रम आणि सामान्य गोवेकरांना मदत करणारे वेगवेगळे उपक्रम राबवत  आहे. आम आदमी पार्टीने गोव्यामध्ये 300 हून अधिक वीज आंदोलनांचे आयोजन केले आहे, ठिकठिकाणी ऑक्सिजन चाचणी केंद्रांची स्थापना केली आहे आणि ऑक्सीमीटर सेवेद्वारे घरोघरी जाऊन काम केले आहे. साथीच्या काळात आम आदमी पक्षाच्या स्वयंसेवकांनी गोवेकरांना वैद्यकीय सेवेपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत सर्व काही मिळवण्यासाठी दिवस -रात्र काम केले. अलीकडेच 2 लाख 93 हजार कुटुंबांनी अरविंद केजरीवाल यांच्या मोफत 24/7 विजेच्या हमीसाठी आपला पाठिंबा नोंदवला.
आप  चे पंचायत स्तराचे स्वयंसेवक प्रत्येक पक्षाच्या बूथमध्ये बूथ टीम तयार करतील. आपचे मजबूत संघटन तयार झाल्याने भाजप आणि काँग्रेस हादरले आहे . राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री बदलून आपले अपयश लपवत आहे तसच डॉ प्रमोद सावंत यांनी आपच्या अनेक योजनांच्या नक्कल  करण्यास भाग पाडले आहे अस मत पक्षाने व्यक्त केल .
“आपची आता गोव्यात एक मजबूत संघटना आहे. आमची पंचायत टीम तळागाळापर्यंत पोहोचली आहे आणि प्रत्येक गोवेकर , उत्तर किंवा दक्षिण गोव्यात असो, आता गोव्याचे भविष्य म्हणून” आप “च्या समर्थनात आहेत. अस राहुल म्हांबरे म्हणाले.