Connect with us

गोवा खबर

आम आदमी पक्षाच्या फातोर्डा कार्यालयाचे उद्घाटन!

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
आप फातोर्डा आणि गोव्यासाठी एकमेव पर्याय : संदेश तेलीकर देसाई
गोवा खबर:आम आदमी पक्षाचे फातोर्डामध्ये नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले .फातोर्डामध्ये पक्ष आक्रमकपणे काम  करत असून मतदारसंघात तळागाळात पक्षाचे कार्य पोहोचले आहे. या कार्यालयाद्वारे इथले स्थानीक आता पक्ष नेतृत्वापर्यंत सहज पोहोचू शकतील.
आप फातोर्डा विधानसभा प्रभारी संदेश तेलीकर देसाई पक्षाला फातोर्डामध्ये मजबूत करत आहेत . फातोर्डा येथील रहिवासी भाजप आणि काँग्रेसला कंटाळले आहेत आणि विद्यमान आमदार विजयी सरदेसाई यांच्यामुळे निराश आहेत, महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान देखील त्यांचे आमदार गायब होते केवळ आम आदमी पक्षाने ऑक्सिमेंटर्स, डॉक्टर हेल्पलाइन आणि अगदी रेशनच्या मदतीसाठी बाहेर पडले.
आज प्रत्येक कामासाठी फातोर्डा येथील नागरिकांना नगरसेवक  किंवा आमदारांकडे भीक मागावी लागते मात्र आम आदमी पक्ष याला अपवाद ठरणार असून सामान्य गोवेकरांच्या समस्या, शिक्षणापासून ते आरोग्यसेवेपर्यंतची काळजी घेण्यासाठी आप तत्पर असेल अस आम आदमी पक्षाचे गोवा उपाध्यक्ष संदेश तेलीकर देसाई म्हणाले.
“आप गोमंत भूमीवर रुजत असून गोवेकरांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहे .राज्यासाठी फक्त आपच भविष्य आहे” असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे म्हणाले

Continue Reading