Connect with us

गोवा खबर

अरविंद केजरीवाल यांच्या योजनेची  गोवा सरकारकडून नक्कल

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
अंमलबजावणी केजरीवाल सरकार प्रमाणे करावी  :  आपचा सल्ला 

 

 

 

 

 गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी  आणखी एका अरविंद केजरीवाल यांच्या योजनेची नक्कल केली असल्याच सांगून आम आदमी पक्षाने डॉ  प्रमोद सावंत यांच्या ‘सरकार तुमच्या  दारी’  योजनेचे स्वागत केले तसच या योजनेची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याची विनंती केली. 

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि राष्ट्रीय प्रवक्ते अरविंद केजरीवाल यांनी गोवेकरांना  मोफत वीज देण्याची घोषणा केल्यापासून डॉ प्रमोद सावंत  आपच्या प्रत्येक योजनेची नक्कल करत  आहेत मात्र केवळ योजनेची नक्कल करून चालणार नाही तर त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न करावे अशी  अस आवाहन आम आदमी पक्षाने केले.
अरविंद केजरीवाल यांचे  गोवेकरांना मोफत वीज देण्याच्या घोषणे पासून गोव्यातील भाजप सरकार  केजरीवाल मॉडेलची नक्कल  करण्यासाठी नवीन घोषणा करत आहे. आमच्या  पक्षाचा खरा विजय असून आम आदमी पक्षावर चिखलफेक करू त्यांना पुन्हा आमच्या धोरणांची नक्कल करायला भाग पाडले जाते अशी प्रतिक्रिया पक्षाने दिली.
गोवेकरांना मोफत सेवा मिळू शकते हे स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रमोद सावंत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या मोफत पाणी धोरणाची नक्कल केली . मात्र या घोषणेवर अनेकांना संशय असून भविष्यात वाढीव बिले दिले जाणार असल्याची भीती काहीजण व्यक्त करत आहेत तसच मोफत पाण्याची घोषणा कित्पित सत्यात उतरेल याची शाश्वती नाही कारण अजूनही अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासत आहे.
“मी प्रमोद सावंत यांना सांगू इच्छितो की अनुकरण करून तुम्ही आमच्या योजनेची अप्रत्यक्ष प्रशंसा केली आहे  अस असल तरी  गेली 4 वर्षे या  योजना कुठे होत्या ?” असा सवाल आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांब्रे यांनी उपस्थित केला , “प्रमोद सावंत आमच्या योजनांची नक्कल करत आहेत याचा आम्हाला आनंद असताना, त्यांनी अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे योजना राबवतात  याची खात्री करुन घ्यावी असा सल्ला हि त्यांनी दिला

Continue Reading