Connect with us

गोवा खबर

अरविंद केजरीवाल यांचा 20 सप्टेंबर रोजी गोवा दौरा

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

गोवा खबर:आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 20 सप्टेंबर रोजी गोवा दौऱ्यावर निश्चित झाला आहे या भेटी दरम्यान ते गोवा  राज्यातील आप कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीत आणि पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना करणार आहेत. 

आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यानंतर राज्यात २४०० युनिट वीज पुरवठा मोफत  आणि २४x7 विनाखंडीत वीजपुरवठा सुनिश्चित करेल अस आश्वासन त्यांनी मागील गोवा भेटी दरम्यान केजरीवाल यांनी केल होत. या घोषणे नंतर सत्ताधारी आणि विरोधकांनाही फुटला घाम फुटला
केजरीवाल यांच्या घोषणे नंतर प्रमोद सावंत,यांनी दोन योजना जाहीर केल्या ज्या स्पष्टपणे आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या  योजनेच्या हुबेहूब योजना होत्या त्यातील एक म्हणजे  एक विनामूल्य पाणी योजना आणि एक खिडकी  सेवा योजना. मात्र सरकारच्या या योजना अंमलबजावणीच्या पहिल्याच टप्प्यात हरवणार नाही याची सरकारने दखल घ्यावी अस आवाहन आम आदमी पक्षाने केले आहे .
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत असे आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले. “केजरीवाल मॉडेलच्या भीतीमुळे कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनीही विविध राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची बदली करावी लागली .इतर पक्ष फक्त मुख्यमंत्री बदलू शकतात, तर आम आदमी पक्ष राजकारण आणि प्रशासन बदलेल”अस प्रतिक्रिया म्हांबरे यांनी दिली