Connect with us

गोवा खबर

आम आदमी पक्षाला गोवेकरांची मान्यता  !

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
२ लाख ९३ हजार कुटुंबाची मान्यता
वीज मोहिमेला गोव्यात मोठे यश
मोफत वीज या अरविंद केजरीवाल यांच्या पहिल्या आश्वासनाला गोवेकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला .आम आदमी पक्षाच्या गोव्यातील घराघरात जाऊन प्रचार मोहीम पूर्ण केली. राज्यभरातील 3 लाख 85 हजार घरांना भेट देऊन गोव्यातील 3,500 आप स्वयंसेवक गोव्यातील 90% कुटुंबांपर्यंत पोहोचले. प्रत्येक स्वयंसेवकाने प्रत्येक घरात 15 ते 20 मिनिटे केजरीवालांच्या पहिल्या हमीबद्दल कुटुंबाशी बोलणे आणि त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल यावर चर्चा केली. या दरम्यान 2 लाख 93 हजार कुटुंबांनी पक्षाकडे नोंदणी करून या हमीला पाठिंबा दर्शविला.
आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यावर 24×7 अखंडितपणे वीज पुरवठा सुनिश्चित करताना राज्यात 300 युनिटपर्यंत मोफत वीज तसच जुनी वीज बिले माफ केली जातील आणि शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
  • या घोषणेपासून भाजप भयभीत झाले आहे या मोहिमे दरम्यान सर्वात जास्त प्रतिसाद हा मुख्यमंत्री प्रतिध्वनी करत असलेल्या साखळी मतदारसंघातून मिळाला आहे .इथे  88% घरांनी केजरीवाल यांच्या घोषणेला  समर्थन नोंदवले आहे. गोव्याचे उर्जा मंत्री नीलेश काब्राल यांना मोठा धक्का देत 82% कुटुंबांनी आम आदमी पार्टीच्या हमीचे समर्थन केले आणि केजरीवाल मॉडेलवर विश्वास दाखवला. सदर घोषणेची अंमलबजावणी झाल्यावर गोव्यातील 87% लोकांना शून्य बिले मिळतील याची जाणीव असल्याने बहुतेक गोवेकरांनी  या घोषणेला  मनापासून समर्थन दिले आहे.
आम्हाला आढळले आहे की गोव्यातील बहुतांश कुटुंबे वीज कपात आणि उच्च वीज बिलांनी त्रस्त आहेत. म्हणूनच त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे मनापासून समर्थन केले आहे अस आप’चे गोवा उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले.
राज्यातील गंभीर विषयावर केवळ आम आदमी पक्ष आवाज उठवणारा एकमेव पक्ष आहे असे आप नेते आणि तळेगाव विधानसभा प्रभारी सेसिल रॉड्रिग्स म्हणाले. रॉड्रिग्स म्हणाल्या , “आप ज्या घोषणा करत आहेत त्यापैकी ही पहिलीच आहे जी गोव्याच्या सामान्य माणसाला प्रभावित करेल.”

Continue Reading