Connect with us

क्राइम खबर

सावंत यांनी महिलांसाठी गोवा असुरक्षित बनवला;आपच्या महिला विंग ने सावंत सरकारला फटकारले

Published

on

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

 गोवा खबर:महिलांच्या वाढत्या गुन्ह्यांसाठी आपच्या महिला शाखेने सावंत सरकारला फटकारले. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष न्यायालये आणि सीसीटीव्ही उपकरणा सारख्या ठोस उपाय योजनांची मागणी केली .अलीकडील एनसीआरबीच्या आकडेवारी मुळे गोव्यातील धक्कादायक बाजू समोर आली .गोव्यातील बलात्काराचे प्रमाण 7.8%आहे हा आकडा राष्ट्रीय दर 4.3%च्या दुप्पट आहे. तसच गोव्यात मानवी तस्करीचे सर्वाधिक प्रकरणे आहेत याशिवाय महिलांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये 95.7% प्रकरणे प्रलंबित आहे. अगदी राज्य महिला आयोगही निष्क्रिय असून कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणा झोपली आहे का? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या महिला विंग ने उपस्थित केला

‘आप’ने महिलांवरील हिंसा आणि गुन्ह्यांच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालयाची मागणी केली आहे. सरकारने अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी न्यायालये स्थापन केली पाहिजेत. गस्त वाढवण्यासाठी किंवा गोव्यात महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. सिद्धी नाईक प्रकरणामुळे राज्याचे सीसीटीव्ही निष्क्रिय असल्याच सिद्ध होत असून महिलाच्या सुक्षेच्याच्या बाबतीत सरकार गंभीर नसल्याचे आम आदमी पक्षाच्या महिला विंग ने आरोप केला.

एकूणच सावंत सरकारची वृत्ती ढिसाळ आहे आणि गुन्हेगारांना आळा घालण्या ऐवजी प्रोत्साहन देणारे आहे आहे. बाणावली प्रकरणात सावंत यांनी पीडितेच्या कुटुंबाला दोषी ठरवले, सिद्धी नाईक प्रकरणात पोलिसांना अजून काही यश मिळालेले नाही . चेन आणि फोन स्नॅचिंगसारखे छोटे गुन्हे राज्यात नित्याचे झाले आहेत.

“एकेकाळी सुरक्षित राज्य समजल्या जाणाऱ्या गोव्यात झपाट्याने गुन्हाचे प्रमाण वाढत आहे तसच राष्ट्रीय सरासरीपेक्षा गोव्यात बलात्काराचे प्रमाण जास्त आहे. सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेला विनोदात बदलले आहे. ”अस आप गोवा महिला विंग उपाध्यक्ष अॅड सुषमा गौडे म्हणाले. “हे महिला सक्षमीकरण आहे का? जेआम्हाला न्याय मिळवणे सोपे का नाही? अस त्या पुढे म्हणाल्या गौडे जोडले.

गोव्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार काय करत आहे? मुख्यमंत्री गोवा आणि तेथील महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. अश्या परिस्थिती मुख्यमंत्री पीडितांना दोष देत आहेत स्त्रियांना सुरक्षितता कशी द्यावी हे मुख्यमंत्र्यांना माहित नसल्यास त्यांनी राजीनामा द्यावा अस “पेट्रीसिया फर्नांडिस आप महिला शाखा अध्यक्ष म्हणाल्या

Continue Reading